रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

70th National Film Awards : ७०व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा, ‘कांतारा’ चित्रपटाने मारली बाजी, मराठीतील ‘वाळवी’ चित्रपटाला पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 16, 2024 | 3:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
70th National Awards Announced, Kantara and marathi movie vaalvi got Awards Read Full List

७० व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात वाळवी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. जाणून घ्या संपूर्ण यादी

National Film Awards 2024 : प्रतिष्ठित व मानाचे समजल्या जाणाऱ्या ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली. आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये अनेक चित्रपट व कलाकारांनी आपली छाप सोडली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून या कलाकृतींचा व कलाकारांचा गौरव केला जाणार आहे. या पुरस्कारामध्ये मराठी कलाकृतींनी विजेत्यांच्या यादीत आपले स्थान पटकावले आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘वाळवी’ला देण्यात आला. ‘वाळवी’ हा चित्रपट २०२३ साली पडद्यावर आला. परेश मोकाशी यांना हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तर झी स्टुडिओजनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. डार्क कॉमेडी प्रकारातला हा रहस्यपट असून या चित्रपटात स्वप्नील जोशी, अनिता दाते केळकर, सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांनी भूमिका साकारल्या आहेत. (70th National Awards Announcement)

मराठीचा आणखी एक सन्मान या पुरस्कारांच्या निमित्तानं झाला आहे. तो म्हणजे साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ जंगल’ या माहितीपटाला उत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे. याच माहितीपटाला उत्कृष्ट निवेदनाचाही पुरस्कार मिळाला आहे. याचबरोबर सचिन सूर्यवंशी यांच्या ‘वारसा’ या माहितीपटालाही पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय बॉलिवूड चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’लादेखील पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाच्या संगीतासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार संगीतकार प्रीतमला मिळाला आहे. तसंच ‘पोन्नियिन सेलवन १’ चित्रपटाला तामिळमधील बेस्ट चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

‘कार्तिकेय २’ चित्रपटाला तेलगूमधील बेस्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय ‘के.जी.एफ. चाप्टर २’ला सर्वोत्कृष्ट कृती दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. अभिनेता ऋषभ शेट्टीला त्याच्या ‘कांतारा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. तसंच मनोज बाजपेयी यांना ‘गुलमोहर’साठी स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळाला आहे. सूरज बडजात्या यांना ‘उंचाई’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. नीना गुप्ता यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. पवन मल्होत्राला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील विजेत्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे:

सर्वोत्कृष्ट अभिनेता – ऋषभ शेट्टी (कातारा)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नित्या मेनन व मानसी पारेख तिरुचित्राबलम (तमिळ)

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – कांतारा

सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपट – अट्ट्म

सर्वोत्कृष्ट तेलगू चित्रपट – कार्तिकेय २

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी

सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – केजीएफ चाप्टर २

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक – प्रीतम (ब्रम्हास्त्र) व ए.आर. रहमान (पी.एस.1)  

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – अरिजीत सिंह (ब्रम्हास्त्र- केसरिया)  

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नीना गुप्ता

विशेष उल्लेखनीय पुरस्कार – मनोज वाजपेयी (गुलमोहर)

Tags: 70th National Film Awards 2024Kantara MovieVaalvi Movie
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Arbaz patel Love life

"खोटा, त्याचा साखरपुडा होऊनही…", अरबाज खानच्या पूर्वाश्रमीच्या गर्लफ्रेंडचे धक्कादायक खुलासे, म्हणाली, "धर्म, जात वेगळी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.