अभिनेत्री दलजित कौर ही सध्या खूप चर्चेत असलेली पाहायला मिळते. आजवर तिने केलेल्या भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. पण आता ती अभिनयामुळे नाही वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आली आहे. ती निखिल पटेलबरोबर लग्नबंधनात अडकली होती. मात्र एका वर्षाच्या आतच दोघांमध्ये मतभेद सुरु झाले आणि त्यांनी वेगळं होण्याच्या निर्णय घेतला. याबद्दल सोशल मीडियावर तसेच माध्यमामध्येही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. दलजितने नवऱ्यावर अनेक आरोपदेखील केले. त्यावर आता निखिल आपली बाजू स्पष्ट केली आहे. (nikhil patel on dalljiet kaur)
निखिलने सांगितले की, “दलजित व मी दुबईमध्ये २०२२ साली भेटलो. त्यानंतर आम्ही भारतातच हिंदू पद्धतिने लग्न केले. लग्नानंतर आम्ही नॉर्वेमध्ये गेलो. आम्ही केन्यामध्ये २०२४ पर्यंत अगदी कुटुंबाप्रमाणे एकत्र राहिलो. त्यानंतर दलजित मुलगा जेडनबरोबर भारतात परत आली”.
पुढे त्याने लिहिले की, “दलजितला केन्याला येऊन कुटुंबाबरोबर एकत्रित वेळ घालवायचा होता. त्यावेळी तिला माहीत होतं की माझी पहिली पत्नी व माझा कायदेशीर घटस्फोट झाला नव्हता. माझ्या वकिलांनी दलजितच्या आई-वडिलांना याबद्दल माहितीदेखील दिली होती. त्यानंतरही तिचे कुटुंबीय या लग्नासाठी तयार झाले. त्यामुळे आम्ही गुरुद्वारा व मंदिरात लग्न न करता हिंदू पद्धतीने लग्न केलं. हे लग्न कायदेशीर पद्धतीने झाले नाही. यामुळे दलजित केन्यामध्ये सहज येऊ शकली. या वर्षी जानेवारीपर्यंत माझा घटस्फोट झाला नव्हता पण त्याआधीच दलजित केन्या सोडून भारतात निघून गेली होती”.
नंतर त्याने लिहिले की, “दलजित एका विवाहित पुरुषाबरोबर लग्न करत आहे हे तिला माहीत होतं. तरीही तिने माझ्यावर फसवणुकीचे आरोप केले. तसेच माझं बाहेर अफेअर सुरु आहे असंदेखील ती म्हणत आहे. २ ऑगस्टला माझा वाढदिवस असतो आणि त्याचदिवशी माझ्या विरोधात तक्रार केली. तिने माझ्याबरोबरही तेच केलं जे तिने तिच्या पहिल्या नवऱ्याबरोबर केलं होतं. तिने तक्रारीमध्ये चुकीचे आरोपदेखील केले आहेत”. दरम्यान आता दलजित व निखिल यांच्यामध्ये असलेले वाद कुठवर जातील याकडे तिच्या चाहत्यांची नजर आहे. तसेच यावर आता दलजित काय प्रतिक्रिया देणार हे पाहाण्यासारखे आहे.