अभिनेत्री रेणुका शहाणे हे कलाविश्वात एक लोकप्रिय नाव आहे. महाराष्ट्र्राच्या हास्याची राणी म्हणून देखील त्यांची ओळख आहे.अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत देखील आपला पाया भक्कम रचला. त्यांनी मालिका असो या चित्रपट अश्या सर्वच स्थरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. तसं रेणुका यांना हास्याने तर सर्वाना वेड लावलं. आता तर त्यांनी अभिनेत्री,दिग्दर्शिका म्हणून आपला जम बसवला.तर अश्या या हरहुन्नरी रेणुका शहाणे यांना काही गोष्टींमुळे वयाच्या दोन-अडीज वर्षांतच घराच्या जबाबदारीची जाणीव झाली.(Renuka Shahane)

रेणुका शहाणे या स्वावलंबी अभिनेत्री आहे.लहानपाणीच त्यांच्या आईला हिचं कधीच कोणावाचून अडणार नाही,अश्या स्वभावाची जाणीव होतीच.पण कालांतराने हे सत्यात उतरलं. जरी त्या कोणावर अवलंबून नसल्या तरीही त्यांना खूप कमी वयातच जबाबदारीची जाणीव झाली होती.त्या दोन-अडीच वर्षाच्याअसताना त्याना भाऊ झाला.त्यांची आई हॉस्पिटलमध्ये असताना त्या बाळाला म्हणजे भावाला भेटायला गेल्या होत्या.पण तेव्हा त्या भावाला बघून आईला म्हणाल्या, तू बाळाची काळजी घे ,मी घराची काळजी घेईल, तिच्या तोंडून हे वाक्य ऐकून रेणुका यांची आई आश्चर्याने बघतच राहिली. एवढ्या लहान वयात जबाबदारीची जाणीव असणारी ही मुलगी मोठेपणी कोणावर अवलंबून राहणार नाही हे सत्य अखेर त्यांच्या आईला त्या दिवशी उघड झालं.
अगदी लहानपणापासूनच स्वावलंबी असलेल्या रेणुका यांनी त्यांच्या या स्वभावानेच आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करत आपली ओळख निर्माण केली.(Renuka Shahane)
हे देखील वाचा – मेटा गाला मध्ये आलियाला ऐश्वर्या अशी हाक मारली तरी तिने राखले परिस्थतीचे भान
रेणुका यांनी हम आपके हे कोण, सुरभी,बकेटलिस्ट, जाणीवा,गुलाबजाम हाच सुंबाईचा भाऊ अश्या अनेक चित्रपटात काम केलं तसेच आता देखील विकी कौशलच्या नुकत्याच रिलीज झालेल्या गोविंदा नाम मेरा या सिनेमात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली. रेणुका शहाणे लवकरच एका मराठी वेब सिरीजमध्ये आणि एका हिंदी सिनेमात देखील झळकणार आहे. हे दोन्ही प्रोजेक्ट्स लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
