Bigg Boss Marathi season 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५ सुरु झालं तेव्हापासून या पर्वाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अल्पावधीतच या पर्वातील स्पर्धकांनी प्रेक्षकांची मन जिंकली. सततचे वाद, भांडण हे सर्व पाहत प्रेक्षक मंडळी आता वैतागलेले दिसत आहेत. सुरुवातीच्या दोन आठवड्यातच स्पर्धकांमध्ये झालेली चढाओढ प्रेक्षकांना खटकलेली दिसली. निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यातील वाद मिटता न मिटता जान्हवी किल्लेकर व वर्षा उसगांवकर यांचा केलेला अपमान साऱ्यांना खटकला. यावरुन जान्हवीला बरेच ट्रोलही करण्यात आलं. जान्हवी किल्लेकरचा उद्धटपणा, नको नको ते बोलणं हे पाहून प्रेक्षक मंडळीच नव्हे तर कलाकार मंडळींनी आवाज उठवलेला पाहायला मिळाला.
दुसऱ्या आठवड्यात जान्हवीने घरात घातलेला धुमाकूळ अनेकांना पटला नाही. जान्हवीने वर्षा यांच्याशीही अपमानाची भाषा केली. इतकंच नव्हे तर पुरस्कारावरुनही त्यांना बोल लगावले. शिवाय जान्हवीने अभिजीतसाठी वापरलेला एका शब्द साऱ्यांना खटकला. जान्हवीच हे वागणं पाहून चाहतेमंडळीच नव्हे तर कलाकार मंडळींनीही आवाज उठवत जान्हवीची खरडपट्टी काढली आहे. जान्हवीने वर्षा यांच्याशी बोलताना अपमानस्पद शब्द वापरले. तसेच त्यांना पुरस्कारावरुनही सुनावले.
आणखी वाचा – “अशा प्रकारचे बनावट फोटो…”, मॉर्फ केलेले फोटो पाहून भडकली जुई गडकरी, म्हणाली, “अशा फॅन पेजला…”
जान्हवी बोलत असताना वर्षा उसगांवकर तिच्या प्रत्येक वाक्याला प्रतिउत्तर देताना दिसत आहेत. या भांडणादरम्यान वर्षा ताई म्हणतात, “मी इथे १०० दिवस टिकणार नंतर बाहेर जाणार, फालतू गोष्टींकडे मी दुर्लक्ष करते. काय तुझी ही गलिच्छ भाषा. याच ऍक्टिंगमुळे मला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. तोही तीन वेळा”. यावर जान्हवीने उत्तर देत म्हटलं की, “तुम्हाला पुरस्कार देणाऱ्यांना आज पश्चाताप होत असेल की, आपण कोणाला पुरस्कार दिला म्हणून”.
आणखी वाचा – …म्हणून राज कुमार यांनी कर्करोग झाल्याचे ठेवले लपवून, मुकेश खन्ना यांनी केला खुलासा, नेमकं काय होतं कारण?
जान्हवीची ही कमेंट ऐकून रितेश देशमुखच नव्हे तर कलाकार मंडळींनीही आवाज उठवला. अशातच जान्हवीची निक्की विरोधातील एक चुगली रितेशने सांगितली. हे ऐकून जान्हवी ढसाढसा रडू लागली. आणि तिला चक्करही आली. यावर आता जय दुधानेने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टवर जयने “सरकार ओव्हर ऍक्टिंगसाठी अवॉर्ड नाही देत का?, असेल तर कृपया जान्हवीला द्या. उत्तम कामगिरी”, अशी कमेंट करत जान्हवीला टोला लगावला.