Bigg Boss Marathi season 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे सुरु झाल्यापासून या सीझनची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या पर्वाचा आता दुसरा भाऊचा धक्का विशेष गाजणार असल्याचं दिसत आहे. पहिल्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीची शाळा घेतली होती. याशिवाय त्याने इतर स्पर्धकांनाही सुनावले. असं असलं तरी सलग दुसऱ्या आठवड्यातही स्पर्धक त्याच त्याच चुका करताना दिसत आहेत. दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावर आता रितेश देशमुख जान्हवी किल्लेकरची बोलती बंद करताना दिसणार आहे. दुसऱ्या आठवड्यात जान्हवीने घरात घातलेला धुमाकूळ अनेकांना पटला नाही.
जान्हवीने वर्षा यांच्याशीही अपमानाची भाषा केली. इतकंच नव्हे तर पुरस्कारावरुनही त्यांना बोल लगावले. शिवाय जान्हवीने अभिजीतसाठी वापरलेला एका शब्द साऱ्यांना खटकला. जान्हवीच हे वागणं पाहून चाहतेमंडळीच नव्हे तर कलाकार मंडळींनीही आवाज उठवत जान्हवीची खरडपट्टी काढली आहे. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात बांगड्यांचं खूप महत्त्व असतं. बांगड्या हे सौंदर्यतेचं प्रतीक आहे आणि याच बांगड्यांवरुन जान्हवीने केलेलं भाष्य संपूर्ण महाराष्ट्राला खटकलं आहे. यावरुन भाऊच्या धक्क्यावर रितेश जान्हवीला चांगलंच सुनावताना दिसत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला बांगड्या घालण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर जाब विचारताना दिसत आहे. नुकताच याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. रितेश जान्हवीला जाब विचारत म्हणतो,”जान्हवी. अभिजीतला तुम्ही म्हणालात बांगड्या घाल. बांगड्या घाल म्हणजे काय?. बांगड्या म्हणजे शक्तीचं प्रतीक असलं पाहिजे. याच बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया फक्त घर नाही तर देश सांभाळतात. बाकीच्यांना बाहेर काढेल की नाही माहिती नाही पण तुम्हाला नक्कीच बाहेर काढणार”, असं म्हणत भडकताना दिसत आहे.
आणखी वाचा – Video : खुशबू तावडे दुसऱ्यांदा गरोदर, लवकरच देणार बाळाला जन्म, व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा ‘लय भारी’ खेळ सुरु झाला आहे. नव्याचे नऊ दिवस संपले असून आता एकमेकांच्या वरचढ गोष्टी घडताना दिसत आहेत. दुसऱ्या आठवड्यात कोण अचूक खेळलं आहे कोण चुकीचं आहे हे भाऊच्या धक्क्यावर कळेल. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. प्रेक्षकांनी या सीझनला सुपरहिट केलं आणि या आठवड्याच्या खेळाचा महाराष्ट्रभर चांगलाच बोलबाला केलं.