Bigg Boss Marathi 5 Update : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची सुरुवात ही भांडणांनी झाली. पहिल्या दिवसापासून घरात वाद होत आहेत. निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यात पहिल्या दिवसापासूनच टोकाची भांडणं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. निक्कीने वर्षा यांच्याशी केलेली वागणूक कुणालाच आवडलेली नाही. निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यात भांडण होत असल्यामुळे व त्यांच्या भांडणातील निक्कीच्या असभ्य बोलण्यामुळे वर्षा यांच्या चाहत्यांचा व कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींचा संताप झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत वर्षा उसगांवकरांचा उल्लेख निक्कीने “काळ्या मनाच्या मॅम, ब्लॅक हार्टेड” असा केला होता. त्यामुळे तिचे हे शब्द वर्षा उसगांवकर, त्यांचे अनेक चाहते व काही मराठी कलाकारांनाही आवडलेलं नाही. (Surekha Kudachi special post for Varsha Usgaonkar)
याबद्दल अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, पुष्कर जोग, कोसजोरी शहाणे यांसह इतर अनेक कलाकार मंडळींनी वर्षाताईंच्या अपमानाबद्दल पोस्टशेअर करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. अशातच अभिनेत्री सुरेखा कुडची यांनीही एका पोस्टद्वारे त्यांची भूमिका मांडली आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी वर्षाताईंना पाठींबा दिला असून निक्कीने त्यांच्याबरोबर केलेली वागणूक ही चुकीची असल्याचे म्हटलं आहे.
या पोस्टमध्ये सुरेखा यांनी असं म्हटलं की, “‘बिग बॉस मराठी ५’ची आतुरेतेने वाट बघत होते. वर्षाताई आणि पॅडीला पाहून मनापासून आनंद झाला. पण काही स्पर्धक मराठी असून मराठी माणूस व त्यांच्या मानसिकतेबद्दलबोलत होते हे पाहून वाईट वाटलं. मी स्वत: दाक्षिणात्य आहे, माझी भाषा कन्नड आहे. पण मला ओळख दिली ती या महाराष्ट्राने. आपल्या महाराष्ट्रात कलावंतांवर प्रेम करणारे, कलाकारांचा आदर करणारे प्रेक्षक आहेत. असं असताना ‘बिग बॉस’च्या घरात आपल्या वयापेक्षा दुप्पट वय असलेली, एक काळ मराठी इंडस्ट्री गाजवलेल्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा अपमान करतात तेव्हा वाईट वाटतं.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : अखेर ‘बिग बॉस’ने निक्कीचा माज उतरलावच, सर्वांसमोर वर्षाताईंची मागितली माफी, म्हणाली…
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “मान्य आहे त्या घरात सगळेच सारखे आहेत आणि सगळेच स्पर्धक आहेत. पण बोलताना भान ठेवणं गरजेचे आहे. ३ महिन्यांचा खेळ संपला की, शेवटी माणूस म्हणून कसे आहात? हेच पहिलं जातं. आणखी एक म्हणजे आत्ता कुठे एक मालिका संपवून आलेले कलाकार जेव्हा आपल्या वरिष्ठ कलाकाराला पाण्यात पाहतो, त्यांच्यावर हसतो. हे पाहिल्यावर लाज वाटते. असो वर्षाताई उभा महाराष्ट्र तुमच्या बाजूने उभा आहे”.