‘कलर्स मराठी’ वाहिनीवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘बिग बॉस मराठी’ या नव्या पर्वाने साऱ्यांना वेड केलं आहे. यंदाच्या या ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वात विविध क्षेत्रातील कलाकार मंडळींना संधी देण्यात आली आहे. केवळ मराठी कलाकारचं नव्हे तर गायक, कीर्तनकार, रॅपर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांना या प्लॅटफॉर्मने संधी दिली आहे. यंदाच्या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा दबदबा असलेला पाहायला मिळाला. यंदाच्या या नव्या पर्वात कोल्हापूरच्या धनंजय पोवारच्या एण्ट्रीने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. पहिल्या दिवसापासून धनंजयने स्वतःच मत मांडायला सुरुवात केली असून तो स्पर्धकांशी मिळून मिसळून वागताना दिसत आहे. (Dhananjay Powar Lifestyle)
धनंजय पोवार हा कंटेंट क्रियेटर बिझनेस मॅन तसेच Vlogger आहे. धनंजयच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दहा लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. धनंजय सोशल मिडियावर महिला केंद्रित समस्या गमतीशीर अंदाजात मांडताना दिसतो. महाराष्ट्रातील फेमस रिल्सस्टार आणि प्रसिद्ध उद्योगपती डी पी म्हणजेच धनंजय पोवार हा थोड्याच दिवसांत अधिक लोकप्रिय झाला आहे. धनंजय पोवार हा सतत कॉमेडी व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करत असतो.
धनंजय पोवार हा पहिल्यापासूनच पेशाने उद्योजक आहे. धाराशिव परिसरामध्ये त्याचा डी पी अमृततुल्य या नावाने चहाचा व्यवसाय आहे. धनंजय पोवार याने नवीन चहाचा व्यवसाय सुरु केल्याने तो चांगलाच चर्चेत आला होता. याशिवाय धनंजय पोवार यांच्या वडिलांचे ६० हजार स्क्वेअर फूट परिसरात सोसायटी फर्निचरचा खूप मोठा व्यवसाय आहे. सध्या धनंजय पोवार त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळतात. सोशल मीडियावर सतत सोसायटी फर्निचरमधील व्हिडीओ तो अपलोड करत असतो. याचबरोबर “आईसाहेब वस्त्रम” हा व्यवसायदेखील त्याने सुरु केला असून या व्यवसायाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : चक्क भांडी घासायचा कोकण हार्टेड गर्लला ट्रॉमा, ढसाढसा रडलीही अन्…; कसा निभाव लागणार?
धनंजय पोवार याच्या या यशामागे खूप मोठा खडतर प्रवास आहे. धनंजयच्या या दुकानाची प्रसिद्धी झाली ती त्याच्या सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे. संपूर्ण कोल्हापुरात फेमस झाल्यानंतर महाराष्ट्रभर त्याच्या फर्निचरच्या दुकानाची ख्याती पसरली. धनंजयच्या या फर्निचरच्या शोरुममध्ये अनेक कामगार कामाला आहेत. तसेच ते सतत या कामगारांबरोबर व्हिडीओ बनवत असतात. फर्निचरच्या दुकानात आलेल्या त्यांच्या ग्राहकांसोबत देखील ते कॉमेडी व्हिडीओ बनवत असतात. आता सध्या धनंजय ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालताना दिसत आहे. प्रेक्षक व त्याचे फॅन्सही धनंजयला सपोर्ट करताना दिसत आहेत.