Bigg Boss Marathi Update : वाद आणि ‘बिग बॉस’ हे समीकरण काही जुनं नाही. ‘बिग बॉस’च्या घरात अनेकदा वाद, भांडणं झाली आहेत. यंदाच्या बिग बॉसच्या नवीन पर्वाची सुरुवातचे अनेक वाद, मतभेद व भांडणांनी झाली. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्य एकमेकांसोबत चांगलेच भिडताना दिसत आहेत. आता आजच्या एपिसोडमध्येही जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. (Bigg Boss Marathi 5 Aarya Janhavi fight)
‘बिग बॉस मराठी’चा नवा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी आणि आर्या एकमेकींसोबत नडताना दिसून येत आहे. जान्हवी-आर्यामध्ये धक्काबुक्की झालेलीदेखील पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी आर्याला असं म्हणते की “नॉमिनेशनदरम्यान आर्या किती फडफड करत होती”. त्यावर आर्या असं म्हणते की, “माझ्यामध्ये तुम्ही आता येऊ नका”.यावर जान्हवी आर्याला “किती दिवस ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राहतेस ना तेच बघते मी” असं म्हणत तिला थेट आव्हान देते. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायल मिळत आहे. त्यांच्यातील हे भांडण इतकं विकोपाला जातं की, त्या एकमेकींच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे त्यांच्यात धक्काबुक्कीही होते.
आणखी वाचा –
आर्या-जान्हवीचा प्रोमोमधील पंगा पाहून ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात काय घडतंय हे बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे. त्यातच ‘बिग बॉस’च्या घरात एकमेकांबरोबर शारीरिक न होण्याचा नियमही तोडला गेला आहे. त्यामुळे बिग बॉस आता यावर काय निर्णय घेणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या घरात नॉमिनेशनसाठी प्रेक्षकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अंकीता, वर्षा, सुरज, धनंजय व योगिता आदी स्पर्धक नॉमिनेशन प्रक्रियेत आहेत. त्यामुळे आता घरातून बाहेर कोण जाणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.