Bigg Boss Marathi Season 5 Update : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की व वर्षा यांच्यात पुन्हा वाद पेटलेला पाहायला मिळत आहे. कालही निक्की व वर्षा यांच्यात वाद झाला. निक्की वर्षा यांना नको नको ते बोलली. तसेच या पर्वाला सुरुवात झाल्यापासून निक्कीने वर्षा यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. तर निक्कीने नॉमिनेशन टास्कमध्येही वर्षा यांना नॉमिनेट केलं आहे. यावेळी तिने काळ्या मनाच्या मॅमला मी नॉमिनेट करत आहे असं म्हटलं.
यानंतर आता नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्येही वर्षा व निक्की यांच्यात वाद झालेला पाहायला मिळाला. सगळेच स्पर्धक किचन एरियामध्ये बसलेले असतात. तेव्हा सूरज निक्कीला म्हणतो की, “तू सुद्धा टेकून बेडवर बसली होती, ते मी पाहिलं. असं करु नका नाहीतर ते आम्हाला भोगावं लागेल”. हे ऐकून निक्की म्हणते, “हो. मी बसले होते पण मी लगेच उठले आणि आपल्याला बेड वर बसायची संमती नाही आहे पण आपण सोफ्यावर बसू शकतो”. तेव्हा तिथे वर्षा ताईही बसलेल्या असतात. त्या मध्ये बोलत असतात तेव्हा निक्की त्यांना म्हणते, “तुम्ही तर काहीच बोलू नका तुम्ही काल झोपल्या होत्या”.
आणखी वाचा – Paaru Serial : पारूची प्रार्थना आदित्यला वाचवणार का?, अपघाताचं संकट अखेर टळणार का?, नक्की काय घडणार?
यावर वर्षा म्हणतात, “मी झोपले नव्हते मी बसले होते, तू बोलली ना तंगड वर करुन झोपले होते ते चूक आहे आणि म्हणून मी बोलत आहे”. यावर निक्की अरेरावी करत, “ते काल झालं ना. परत तुम्हाला ते माझ्याकडून ऐकायचं आहे का?, मी परत त्यावर वाद घालावा म्हणून तुम्ही असं बोलत आहात का?”. यावर वर्षा उत्तर देत म्हणतात, “प्रत्येकाकडून चूक होऊ शकते असं सांगण्याच्या मी प्रयत्न करत आहे”.
आणखी वाचा – प्रतिमाला खुश ठेवायला सुभेदार कुटुंबाची धावपळ, तर तन्वी-अर्जुनमधील जवळीकता सायलीला खटकणार?, मालिकेत मोठं वळण
पुढे त्या असंही म्हणतात की, “तू काल अशी एकदम माझ्यावर तुटून पडली म्हणून म्हटलं. यावर निक्की म्हणते, “मी यापुढेही अशीच तुटून पडणार”. त्यावर वर्षा पुन्हा म्हणतात, “आता तू चुकली तर मी तुझ्यावर तुटून पडू का?”. त्यावर निक्की पुढे पुढे बोलत “हो पडा” असं म्हणते.