शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकरांनंतर निक्की तांबोळीचा आर्यावर निशाणा, नको नको ते बोलली, अरबाज-वैभव यांच्याबरोबरही वाद

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 1, 2024 | 11:43 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi update Arya Jadhav fight

‘बिग बॉस मराठी’च्या घरात वर्षा उसगाकरांनंतर निक्कीचे आर्याबरोबर जोरदार भांडण,

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला अगदी दणक्यात सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाची सुरुवातच भांडणं व वादांनी झाली आहे, बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यात भांडण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. निक्कीच्या असभ्य बोलण्यामुळे चाहत्यांचा संताप झाला आहे. निक्कीने वर्षा यांच्याशी केलेली वागणूक आवडलेली नाही,. कालच्या भागांतही त्यांच्यात अनेक वाद झालेले पाहायला मिळाले. बिग बॉसच्या घरात आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धक आपली पूर्ण ताकद लावत आहेत. त्यामुळे एकमेकांमध्ये चुरशीशी लढत पाहायला मिळत आहे. अशातच बिग बॉस मराठीचा नुकताच नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यात आर्या व निक्की यांच्यात भांडण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Bigg Boss Marathi Day 5 update)

कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यात निक्की व  आर्या यांच्यात खडाजंगी होत असल्याचे पाहायला मिळत आहे, या नवीन प्रोमोमध्ये आर्या मला घाबरायला पाहिजे असं मोठ्या आवाजात म्हणते. त्यानंतर निक्की तिला “फट्टू आहेस एक नंबरची” असं म्हणते. यावर आर्याही “पागल मुलगी” असं म्हणते. यानंतर वैभव चव्हाण आर्याला “तू का मध्ये पडत आहेस” असं म्हणते. यावर आर्याही “मला शांत नाई करायचं” असं त्वेषाने म्हणते.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “सारखं सारखं तेच…” ‘बिग बॉस’चं सूत्रसंचालन न करण्यावरुन महेश मांजरेकरांचं वक्तव्य, म्हणाले, “होस्ट बदलायचा की नाही…”

अशातच पुढे आर्या व अरबाज यांच्यातही मोठे भांडण होत असल्याचे या नवीन प्रोमोमधून कळत आहे. अरबाज तिला “फालतूच मला सांगायचं नाही” असं म्हणतो. यावर तीही अरबाजला मोठ्या आवाजात “चल चल” असं म्हणतो. यावरुन आजच्या भागात स्पर्धकांमध्ये मोठे भांडण होणार असल्याचे दिसून येत आहे. आता या भांडणात कुणाचा किती निभाव लागणार? कोण कुणावर किती वरचढ ठरणार? हे प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

आणखी वाचा – वृषभ राशीच्या आनंदात होणार वाढ, तर मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस भाग्याचा, इतर राशींसाठी दिवस कसा असेल?

दरम्यान, कालच्या भागात बिग बॉस’च्या घरातील पहिली नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. घरातील एकूण १६ स्पर्धकांपैकी वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण व पुरुषोत्तमदादा पाटील या सदस्यांचा समावेश होता. आता या पाच सदस्यांमधून कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेणार हे येत्या विकेंडच्या वारमध्ये सिद्ध होईल.

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Marathi Newsbigg boss marathi new season
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
bigg boss marathi new season update

Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकरांवर निक्कीची दादागिरी सुरुच, ठरवून टार्गेट करण्याचा प्रयत्न?, रितेश देशमुख तरी बाजू घेणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.