टेलिव्हिजनवरील ‘मिले जब हम तुम’, ‘नागिन’ या मालिकांमधून अभिनेता अर्जुन बिजलानी हा अभिनेता अधिक लोकप्रिय झाला. काही दिवसांपूर्वी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल झाला होता. त्याने उपचार घेण्यासाठी रुग्णालयात भरती झाल्याची स्टोरी इन्स्टाग्रामवरुन शेअर केली होती. त्यानंतर तो शस्त्रक्रिया करुन घरी परतल्याची पोस्टही त्याने शेअर केली होती. तसेच तो बरा होत असल्याचेही चाहत्यांना सांगितले. मात्र पुन्हा एकदा त्याच्याबद्दलची एक माहिती समोर आली आहे. यामध्ये त्याचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. गोव्यामध्ये त्याचा अपघात झाल्याचे वृत्त हाती आले आहे. (arjun bijlani accident)
अर्जुन त्याची पत्नी नेहा स्वामी व मुलगा अयानबरोबर गोव्यामध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. मात्र तिथे अर्जुनचा अपघात झाला असून त्याला गंभीर दुखापत झाल्याचे समजत आहे. सोशल मीडियामार्फत त्याने फोटो शेअर करत याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली आहे. दुखापत झालेली असतानाही तो नंतर ‘लाफ्टर शेफ’च्या शूटिंगसाठी मुंबईमध्ये पोहोचला आहे.

अर्जुनने इन्स्टाग्रामवर त्याला झालेल्या दुखापतीचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्या पायाला खरचटले असून त्या ठिकाणी रक्तदेखील साखळल्यासारखे दिसत आहे. त्याच्याबरोबर हा प्रसंग कसा घडला? याबद्दल अधिक माहिती समोर आली नाही. पण तो कुटुंबासह गोव्यामध्ये त्यांचा वेळ घालवत होता. पायाला दुखापत झालेली असतानाही तो मुंबईमध्ये शूटिंगसाठी परतला आहे. त्याने सोशल मीडियावर ‘लाफ्टर शेफ’च्या सेटवरुण काही व्हीडिओदेखील शेअर केले आहेत. यामध्ये सर्व भयंकर अवतारात दिसून येत आहेत.
या आठवड्यात ‘लाफ्टर शेफ’ या कार्यक्रमात अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘स्त्री २’ च्या प्रमोशनसाठी येणार आहे. त्यामुळे यावेळी कार्यक्रमाची थीम हॉरर असणार आहे. निया शर्मा, अली गोनी यांना भयंकर अवतारात पाहिले गेले. श्रद्धाव्यतिरिक्त श्री अनिरुद्धाचार्यदेखील दिसणार आहेत. त्यामुळे या एपिसोडमध्ये नक्की काय बघायला मिळणार हे पाहण्यासारखे आहे.