‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांचा पहिलाच दिवस त्यांच्यासाठी अनेक आव्हानांचा खूप मोठा टप्पा ठरणार आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांचा १०० दिवसांचा प्रवास सुरु झाला असून आता पहिल्या दिवसापासूनच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या स्पर्धकांना पहिल्या दिवशी पाण्यावाचून राहावं लागलं. पाण्यावाचून त्यांची तारांबळ होत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्याच दिवशी स्पर्धकांमध्ये वाद झालेला पाहायला मिळत आहे. (Bigg Boss Marathi 5 Updates)
पहिल्याच दिवशी पाणी गेल्याने स्पर्धकांची पंचाईत झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर आता ‘बिग बॉस’च्या घरातील दुसरा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ यांनी स्पर्धकांना एकत्र लिव्हिंग एरियामध्ये बोलावलेलं असतं. त्यावेळी वर्षा उसगांवकर यांना तिथवर पोहोचण्यास उशीर होतो. वर्षा यांचं हे वागणं घरातील सर्व स्पर्धकांना खटकतं. त्यावरुन सगळेच स्पर्धक त्यांना बोलावू लागतात. अशातच आता पहिल्याच दिवशी वर्षा व स्पर्धकांमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला.
आणखी वाचा – पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस’च्या घरातील पाणी गायब, सदस्यांची तारांबळ, आणखी नवा ट्विस्ट आणणार
समोर आलेल्या प्रोमोमध्ये, वर्षा या मेकअप करत असतात. तेव्हा निक्की त्यांना बोलवायला येते, “पाणी कधीच आलं होतं, लवकर चला”, असं म्हणत त्यांना बोलावते. तेव्हा वर्षा त्यांना, “पाणी केव्हाच आलं होतं पण दुसरं कुणीतरी गेलं होतं. तिला सोडून कसं येणार”, असं म्हणत लिपस्टिक लावत असतात. त्यावर निक्की त्यांना “लिपस्टिक नंतर लावा”, असं सांगते. यावर वर्षा तिला, “लिपस्टिक नंतर लावा कसं, मला थोडंतरी करु दे. तू छान तयार होऊन गेली आहेस”, असं म्हणतात.
इतकं बोलूनही वर्षा या मेकअप करत असतात. ते पाहून इतर स्पर्धकही कुजबुज करु लागतात. जान्हवीही “आम्हीही मेकअप न करता इथे बसलो आहोत”, असं त्यांना ओरडून सांगते. तर घनश्याम “ताई चला ना”, असा आवाज देत वर्षा यांना बोलावतो. यावर इतर स्पर्धक “ताई आम्ही तर थांबलोय पण ‘बिग बॉस’ थांबले आहेत”, असं म्हणतात. यावर वर्षा त्यांना कल्पना आहे त्याची असं म्हणत येते असं सांगते. यावर निक्की “हे वागणं प्रत्येकाचं अनादर करण्यासारखं आहे”, असं म्हणते.