‘सैराट’ या पहिल्याच चित्रपटातून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगूरु. रिंकूला ‘सैराट’ चित्रपटातील ‘आर्ची’ या नावानेदेखील ओळखलं जातं. सैराटनंतर रिंकूने अनेक चित्रपट व सीरिजमधून काम केलं आहे. पण तिला आजही ‘सैराट’मुळेच अधिक ओळखलं जातं. आपल्या अभिनयाने चर्चेत असणारी ही अभिनेत्री सध्या एका विशेष कारणामुळे चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे रिंकूने नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. या नवीन कारचे काही खास फोटो तिने सोशल सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. रिंकूने आपल्या सोशल मीडियावर कारबरोबर खास फोटो काढत आपल्या चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
रिंकू राजगुरुने तिच्या आयुष्यातील पहिली कार नुकतीच खरेदी केली आहे. या आलिशान गाडीचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी नव्या गाड्या घेत आपली स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये आता रिंकूचं नावदेखील जोडलं गेलं आहे. नव्या आलिशान कारबरोबरचे फोटो शेअर करत रिंकूने असं म्हटलं आहे की, “पहिली गाडी ही कायम खास असते. हक्काची पहिली गाडी खरेदी करण्याची भावना काहीतरी वेगळीच असते. जी तुम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. ही गाडी म्हणजे माझं नवीन प्रेम आहे”.
पांढऱ्या रंगाच्या आलिशान कारबरोबर रिंकूने ट्विनिंग करत फोटोशूट केलं आहे. रिंकूने नवीन कारबरोबरचे फोटो शेअर करताच चाहत्यांनी व मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. स्वप्नील जोशी, छाया कदम, ऋतुजा बागवे, सायली संजीव, प्रार्थना बेहेरे यांसह अनेक कलाकारांनी कमेंट्स करत रिंकूला शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – “आमचं ठरलंय” म्हणत अक्षया देवधरने सांगितली गुडन्यूज, खास पोस्टही शेअर केली अन्…; म्हणाली, “लवकरच…”
दरम्यान, ‘सैराट’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर रिंकूने एकामागोमाग एक अनेक चित्रपटांत काम केले. मराठी सिनेसुष्टीसह अभिनेत्रीने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ या चित्रपटात रिंकू महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचंही भरभरुन कौतुक करण्यात आलं