कलाकारांप्रमाणेच त्यांचे कुटुंब देखील चर्चेत असतात.यासोबतच अनेक स्टार किड्स देखील चाहत्यांचं लक्ष वेधतात.अनेक अभिनेत्री या लग्नांनंतर सिनेसृष्टीपासून दुरावल्या आहेत पण त्या सोशल कमालीच्या सक्रिय असलेल्या पाहायला मिळतात. अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस.(Mrunal dusanis)
अभिनेत्री मृणाल दुसानीस ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. त्यानंतर मृणालने बऱ्याच मराठी मालिकांमध्ये काम केलं. पण लग्नानंतर तिने ब्रेक घेतलाय.व ती अमेरिकेत स्थायिक झाली. त्यांनतर मृणालने एका गोंडस मुलीला देखील जन्म दिला. ही गुडन्यूज तिने सोशल मीडियावरून चाहत्यांबरोबर शेअर केली होती.मृणाल दुसानीसने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला असला तरीही, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र नेहमी सक्रिय असते.तर आता चाहते तिला पुन्हा ऑनस्क्रीन पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत .
हे देखील वाचा : ‘आणि जेव्हा चाहते कलाकाराला लिफ्ट देतात’ कोल्हापूरकरांचा फॅन झाला अभिनेता उत्कर्ष शिंदे
मृणाल कुटुंबासोबत तसेच लेकीचे म्हणजे नुरवीचे काही फोटो व्हिडीओ शेअर करत असते.आता देखील तिने कुटुंब सोबतचे काही खास फोटो शेअर केलेत.यात ती कुटुंबासोबत ट्रिपवर फिरत qulity time स्पेंड करताना दिसते. “just a small trip with my loved ones”असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं. तर तिच्या या फोटोला चाहत्यांनी पसंती दिली असून अनेकांनी कमेंटचा वर्षाव केलाय.पण या फोटोवर काही चाहत्यांनी beautiful as ususal , come back soon, अहो कुठे गेले तुम्ही मालिका सोडून अश्या कमेंट करत तिला मिस करत असल्याचं सांगितलं.(Mrunal dusanis)
मृणालने २०१६ मध्ये नीरज मोरेसोबत लग्नगाठ बांधली.तो सॉफवेअर इंजिनिअर आहे. त्यामुळे तो कामानिमित्त अमेरिकेत राहतं असल्यामुळे मृणाललाही तिकडेच स्थायिक व्हावे लागले. सुखांच्या सरी या मालिकेच्या वेळी ती भारतात आणि तो अमेरिकेत राहतं होता.पण मालिका संपताच ती अमेरिकेत स्थायिक झाली.तिचा तिकडे बदललेला लूक पाहून चाहते थक्क राहिले.ती जरी अमेरिकेत असली तरीही ती सोशल मीडियावरून तिचे अपडेट चाहत्यांना देत असते.तरीही मृणालचे चाहते मात्र तिची प्रतीक्षा करत आहेत. ती कधी स्क्रीनवर दिसतेय, याची वाट बघत आहेत.तर आता मृणाल पुन्हा सिनेसृष्टीत येणार का? हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
