बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक गॉसिप नेहमीच कानावर येत असतात. यामध्ये नेहमीच चर्चेत असणार कुटुंब म्हणजे बच्चन कुटुंब. रेखा व जया बच्चन या दिग्गज अभिनेत्रींना एकाच फ्रेममध्ये पाहणे नेहमीच दुर्मिळ झाले आहे. मात्र, ही अशक्य गोष्ट शक्य झाली आहे आणि याची सध्या चर्चा सुरु आहे. जेव्हा २०१५ मध्ये एका अवॉर्ड सोहळ्यामध्ये अमिताभ बच्चन यांना ‘पिकू’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार घोषित करण्यात आला. आणि त्यावेळी काही वेळातच रेखा जया बच्चन यांना मिठी मारण्यासाठी धावली. (Rekha Hugged Jaya Bachchan)
‘बिग बीं’च्या नावाची घोषणा होताच जया व अमिताभ दोघीही आपापल्या जागेवर उभ्या राहिल्या. त्यानंतर अमिताभ पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजच्या दिशेने निघाले. रेखा काही अंतरावर बसली होती, तिने जयाकडे धाव घेतली आणि तिला घट्ट मिठी मारली. यानंतर अमिताभ यांनी आदराने सन्मान घेत साऱ्यांकडे नजरा फिरवल्या. चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी रणवीर सिंगसह अमिताभ बच्चन यांच्या नावाची घोषणा केली. पुरस्कार स्वीकारताना दोघेही स्टेजवर मिठी मारतानाही दिसले.

रेखा व अमिताभ बच्चन यांनी ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘मिस्टर नटवरलाल’ आणि ‘गंगा की सौगंध’सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. यश चोप्रा यांच्या ‘सिलसिला’ (१९८१) चित्रपटात हे तिघे एकत्र दिसले. ज्याने बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध जोड्यांपैकी एक अमिताभ व रेखा यांनी शेवटच्या वेळी स्क्रीन शेअर केली होती. रोमँटिक ड्रामा प्रदर्शित होताच फ्लॉप झाला. चित्रपटातील ही कथा खऱ्या आयुष्याशी जोडल्याच्या बातम्यांनी तेव्हा जोर पकडला होता.
२००४ मध्ये सिमी गरेवालच्या एका मुलाखतीत, जेव्हा रेखाला विचारण्यात आले की, ती अमिताभ बच्चनच्या प्रेमात आहे का, तेव्हा अभिनेत्री म्हणाली, ‘अगदी’. तिने पुढे स्पष्टीकरण दिले की, “अरे, हा मूर्खपणाचा प्रश्न आहे. मी साइन आउट का केले पाहिजे? मी हे का नाकारु? मी त्यांच्यावर प्रेम करत नाही असं नाही आहे. मी नक्कीच करते. मला त्या व्यक्तीबद्दल बरंच काही वाटत”. मात्र, त्याच मुलाखतीत त्यांनी हेही स्पष्ट केले की ते कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हते.त्या म्हणाल्या, “माझे त्याच्याशी कधीच वैयक्तिक संबंध नव्हते, हे खरे आहे. या चर्चांवर व अनुमानात काहीच तथ्य नव्हते”.