अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या हसऱ्या चेहऱ्याने आणि परखड अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली. प्राजक्ताचे चाहते तरुण मंडळींपासून लहान मुलांपर्यंत आहेत. याचबरोबर प्राजक्ता तिच्या फोटोशूटचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करतच असते. प्राजक्ताने नुकतेच तिच्या फोटोशूटचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Prajakta Mali Photoshoot)

प्राजक्ताने या फोटोजमध्ये गोल्डन आणि ब्राऊन कलरचा ड्रेस वेअर केला आहे. प्राजक्ताने डायमंडचे कानातले आणि हातात अंगठी घातल्याने प्राजक्ताच सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. म्हणून प्राजक्ता या लूकमध्ये गोड दिसत आहे. प्राजक्ताने या फोटोजला “निगाहें मिलाने को जी चाहता है । दिल-ओ-जान लुटाने को जी चाहता है।” असे शायराना अंदाजात कॅप्शन दिले आहे. प्राजक्ताच्या या फोटोंवर “लग्न कधी करणार” असे एका चाहत्याने विचारले आहे. तसेच “तुम हुसणपरी तुम जानेजहान तुम सबसे हसी तुम सबसे जवान सौंदर्य साबून प्राजक्ता” अशी मिश्किल अंदाजात कमेंट केली आहे. याचबरोबर या फोटोंवर कोणी कविता तर कोणी शायरी देखील केली आहे.
हे देखील वाचा: ‘तेरे चेहरे से नजर नही हटती’ प्राजक्ताचा लुक पाहून चाहते घायाळ
प्राजक्ताची सुरुवात कशी झाली…
प्राजक्ताने तिच्या करियरची सुरुवात स्टार प्रवाह पासून जरी केली असली तिला खरी प्रसिद्धी जुळून येती रेशीमगाठी मध्ये मेघना या भूमिकेत दिसली होती. तसेच प्राजक्ता आपल्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात होस्टिंग करताना दिसत आहे. याच बरोबर प्राजक्ताचे स्वतःचे “प्राजक्तराज” नावाचं ज्वेलरी ब्रँड आहे. याच बरोबर प्राजक्ता मनसे या पक्षाला पाठींबा देत त्यांच्यासाठी काही कार्य देखील करताना दिसते. “प्राजक्तराज” या तिच्या ज्वेलरी ब्रँडच्या उदघाटनासाठी स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्नी सह उपस्थिती दाखवली होती. (Prajakta Mali Photoshoot)
हे देखील वाचा: ‘तुमच्या सारखे तुम्हीच’- जिनेलियाचा नवीन लुक करतोय चाहत्यांना घायाळ

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळी हिने तिच्या अभिनय कौशल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले. प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. याच बरोबर प्राजक्ता सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते.