बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या साधेपणा, नेहमीच मदत करणारा स्वभाव आणि गोड स्वभावामुळे चर्चेत असते. ती अनेकदा पापाराझी व चाहत्यांशी खूप प्रेमाने बोलताना दिसली आहे, परंतु अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि या व्हिडीओची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ती फ्लाइटमध्ये बसलेली दिसत आहे आणि त्या दरम्यान चुकून तिच्या ड्रेसवर ज्यूस पडल्याने ती रागाने लालबुंद झालेली दिसत आहे. एअर होस्टेसकडे पाहत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. (sara ali khan video)
या व्हिडीओमध्ये सारा अली खानने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. यावेळी अभिनेत्री बिझनेस क्लासऐवजी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करत असल्याचे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या आजूबाजूला एअरलाइन क्रू मेंबर्स उभे आहेत. एअर होस्टेसकडे बघत ती रागाने तिच्या सीटवर उभी राहत त्यांना ओरडताना दिसत आहे.
मात्र, हा व्हिडीओ कोणत्यातरी शूटचा असल्याचे सांगण्यात येत आहे. साराच्या वागण्यावरुन ती जाहिरात किंवा चित्रपटाचे शूटिंग करत असल्याचे स्पष्ट होत आहे. याआधी सारा अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नात भाऊ इब्राहिम अली खानबरोबर दिसली होती. या सोहळ्यामध्ये ती जान्हवी कपूरपासून खूप दूर दिसल्याचंही अनेकांनी म्हटलं. असंही म्हटलं गेलं की सारा व जान्हवी एकमेकांकडे दुर्लक्ष करत होत्या.
आणखी वाचा – “ते नाटक…”, २०२४ च्या अर्थसंकल्पावर जया बच्चन नाराज, म्हणाल्या , “आम्हा कलाकारांना…”
दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, होमी अदजानिया दिग्दर्शित ‘मर्डर मुबारक’मध्ये सारा अली खान दिसली होती. त्यांचा ‘ए वतन मेरे वतन’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. ती ‘धर्मा प्रॉडक्शन’ आणि ‘सिख्या एंटरटेनमेंट’च्या ॲक्शन कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये ती पहिल्यांदा आयुष्मान खुरानाबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय त्याच्याकडे अनुराग बसूच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला ‘मेट्रो देज डेज’ हा चित्रपटही आहे, ज्यात आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख व नीना गुप्ता यांच्याही भूमिका आहेत.