मनोरंजनाचा नित्य नियमीत मार्ग म्हणजे मालिका. अनेक मालिका त्या मालिकांचे विषय त्यातील कलाकार आपल्या मेहनतीने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. मालिकांच्या यादीतील अशीच एक अग्रस्थानी असलेली मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनी वरील आई कुठे काय करते. स्त्रीच्या कणखरतेची, भाऊक बाजूची मांडणी करणारी ही मालिका प्रत्येक स्त्रीचं रूप कस अष्टपैलू असत हे दर्शवते.(Arundhti cares about Anirudh)
मालिकेतील प्रमुख भूमिका असलेले अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर, रुपाली भोसले आणि अभिनेते मिलिंद गवळी हे त्रिकुट प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरलेले दिसतय. अनेक वळणं पार करून अरुंधती आता नव्या संसारात रमलेली दिसते मात्र मुलं आणि त्यांच्या सोबत घडणाऱ्या घटना हे अरुंधतीला शांत बसू देत नाहीत. ईशा आणि अनिष च प्रकरण अनिरुद्धला मान्य नाही आणि त्यांचं लग्न होऊ नये या साठी अनिरुद्ध चे प्रयत्न सुरु आहेत.

मात्र नुकताच प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोत नेहमी त्रागा करणारा अनिरुद्ध भावुक होताना दिसत आहे आणि विशेष म्हणजे अरुंधती आता अनिरुद्धची बाजू घेऊन बोलणार असल्याचं ही दिसत आहे. प्रोमोनुसार अनिरुद्ध इशाला घरी घेऊन जाण्यासाठी येतो. तेव्हा इशा चिडून नाही येणार असं सांगत ‘माझ्या भावनांपेक्षा तुमच्या भावना मला महत्वाच्या नाहीत असं म्हणते, मला तुम्हाला वडील म्हणायची लाज वाटते’ असं देखील इशा म्हणते तेव्हा अनिरुद्ध भावुक झालेला पाहायला मिळतो.
हे देखील वाचा – ‘तब्बल ६० वर्षांनी कोठारे कुटुंबात कन्यारत्न जन्मास आलं आणि…’
तर अरुंधती इशा ला थांबऊन ‘काही तरी भान ठेव वडील आहेत ते असं म्हणत खडेबोल सुनावते.’ तर आता मालिकेत नेमकं पुढे काय होणार अनिरुद्ध भावुक होऊन इशा आणि अनिशच्या लग्नाला परवानगी देणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.(Arundhti cares about Anirudh)