‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, प्रीतम, पारू, श्रीकांत यांनी मिळून मुलाखतीचा नवा डाव आखलेला असतो. अहिल्यादेवी व आदित्य एकत्र येणार का याकडे साऱ्यांच्या नजरा वळलेल्या असतात. मुलाखत घेणारी आई व मुलाच्या बॉण्डविषयी अनेक प्रश्न विचारुन दोघांना भंडावून सोडते आणि दोघेही आपापली उत्तर आपापल्या परीने देत असतात. मुलाखत घेणारी यावेळी काही वस्तूंच्या आठवणी त्यांना विचारते. त्यानंतर रॅपिड फायरचा राउंड घेण्यात येतो. यावेळी आदित्य व अहिल्यादेवी यांनी दिलेली उत्तर ही अगदी समान असतात. त्यामुळे त्यांची आवड ही समान असल्याने हे आई मुलाचं नातं किती खास आहे याबद्दलही मुलाखत घेणारी बोलते. (Paaru Serial Update)
त्यानंतरच एका अशा व्यक्तीला फोन करायचा आहे ज्याच्याशी आपण चुकीचं वागलो आहोत आणि आता त्या वागणुकीने रिग्रेट होत आहे आणि त्याची माफी या फोनद्वारे मागायची आहे. या वेळेला आदित्य पहिला फोन घेतो आणि बोलू लागतो. आदित्य नाव न घेता त्याने केलेल्या चुकीची क्षमा मागतो. त्या व्यक्तीला म्हणतो की, तू माझा श्वास आहेस तू माझं जग आहेस, असं म्हणत ढसाढसा रडू लागतो. आदित्यला भावुक झालेलं पाहून तेव्हा मुलाखत घेणारी विचारते, पण हे तुम्ही कोणत्या व्यक्तीबद्दल बोलत आहात?, तेव्हा अहिल्यादेवी स्वतः सांगतात की, तो माझ्याबद्दल बोलत आहे. असं म्हणत त्या तिथून उठून निघून जातात. निघून जात असतानाच आदित्य खाली उभा असतो आणि गाणं बोलू लागतो. ते गाणं ऐकून अहिल्यादेवी तिथेच जागच्या जागी थांबतात आणि आदित्यने अर्धवट गायलेलं गाणं त्या पूर्ण करतात. यावेळी त्याही थोड्याश्या भावुक झालेल्या पाहायला मिळतात.
आणखी वाचा – अखेर अनंत अंबानी व राधिका मर्चंट अडकले लग्नबंधनात, नवविवाहित जोडप्याचा पहिला फोटो समोर
आदित्य रडत रडतच धावत जात आईला मिठी मारून रडू लागतो आणि पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही असे सांगतो. तर अहिल्यादेवी सांगतात तू मॉडेल म्हणून त्या जाहिरातीत उभा राहिलास याचा मला अजिबात राग आलेला नाही, पण हे सत्य तू माझ्यापासून लपवून ठेवलं त्यामुळे मी दुखावले. यावर आदित्य कबुली देतो की, यापुढे अशी कोणती चूक पुन्हा होणार नाही. त्यानंतर प्रीतमही मारुतीच्या घरातून धावत धावत बंगल्यात येतो आणि अहिल्यादेवींना येऊन मिठी मारतो. तर इकडे दिशाला आदित्य व अहिल्यादेवी एकत्र आलेल्या नको असतात. त्यांना एकत्र पाहून दिशाचाही राग अनावर होतो.
तर दामिनी इकडे तिची मुलाखत न घेता अहिल्यादेवींची मुलाखत घेतली म्हणून चिडचिड करत असते. तर दिशा तिलाही येऊन सुनावते. आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की दिशा हा सगळा राग पारूवर काढते आणि अहिल्यादेवींची शॉल खराब करते आणि पारूवर नाव घेते .आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.