सध्या भारतभरात अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. जगभरातून अनेक दिग्गजांना या शाही सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेत. अनेक दिग्गजांना एअरपोर्टवर स्पॉटदेखील केले गेले. त्यामुळे त्यांच्या लग्नाची शोभा वाढणार आहे. आज राधिका व अनंत यांच्या विवाहसोहळ्यातील विधींना सुरवात झाली असून त्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. दोघांच्याही लग्नाचे वेळापत्रक समोर आले असून कोणते विधी कधी पार पडणार आहेत याबद्दलची माहिती समोर आली आहे. (Anant Ambani and Radhika Merchant Wedding)
अनंत व राधिका यांचा १२ जुलै रोजी म्हणजे आजपासून दुपारी ३ वाजता लग्नाची वरात निघाली असून संध्याकाळी साडेपाच वाजता लग्नास्थळी पोहोचले आहेत. रात्री ९.३० वाजता लग्न पार पडणार असल्याची माहिती समोर आली होती. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होणार आहेत. त्यानंतर १३ जुलै व १४ जुलै रोजी रिसेप्शन होणार आहे.या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याचबरोबर इतर राजकीय नेतेदेखील हजर राहिले असून लालू प्रसाद यादव हे संपूर्ण कुटुंबासहित लग्नासाठी हजर राहिले आहेत. तसेच समाजवादी पार्टीचे सुप्रीमो अखिलेश यादवही उपस्थित राहिले आहेत.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीदेखील दुबईवरुन खास लग्नासाठी पती निक जोनासबरोबर मुंबईमध्ये दाखल झाली आहे. तिने फोटोदेखील शेअर केला आहे. ज्यामध्ये निक व प्रियाका हॉटेलमध्ये एक पोज देताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे बॉलीवूड बादशाह शाहरुख खानदेखील खास अनंत व राधिकाच्या लग्नासाठी मुंबईमध्ये दाखल झाला आहे. पांढऱ्या रंगाच्या अलिशान कारमधून त्याला स्पॉट केले गेले. शाहरुख अनंत व राधिकाच्या हळदी व संगीतासाठी हजर झाला नव्हता. मात्र लग्नासाठी तो मुंबईमध्ये दाखल झाला आहे.
भारतातील सगळ्यांचे लक्ष आता अनंत व राधिकाच्या लग्नाकडे लागले आहे. याचबरोबर अनंत व राधिकाचे कपडेदेखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने राधिकासाठी खास कपडे डिझाईन केले आहेत.त्याचप्रमाणे नवरीबरोबरच सासू नीता अंबानी यांच्या लूकच्या चर्चाही मोठ्या प्रमाणात रंगल्या आहेत.