बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कास्टिंग काउचची शिकार व्हावं लागलं आहे. याबद्दल अनेकदा खूप काही कानावरही आले आहे. कास्टिंग काऊचची शिकार अनेकदा स्त्रिया झाल्या आहेत हे कानावरही आले आहे. पण हे बॉलीवूड आहे आणि पुरुष कलाकारांबरोबरही असं घडतं. काही काळापूर्वी एका अभिनेत्याने याबाबत केलेल्या खुलास्याने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. याबाबत अभिनेत्याने सांगितले होते की, कामाच्या बदल्यात कास्टिंग डायरेक्टरने अभिनेत्याला त्याचे प्रायव्हेट पार्ट दाखवण्याची मागणी केली होती. (Ayushmann Khurrana Casting Couch)
बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता आयुष्मान खुराना हा कास्टिंग काऊचची शिकार बनला. आयुष्मान खुरानाने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याच्याबरोबर घडलेल्या कास्टिंग काउचबद्दल खुलासा केला. यावेळी अभिनेत्याने कास्टिंग काउचची शिकार होण्यापासून तो कसा बचावला हेदेखील सांगितले. आयुष्मानने सांगितले की, “एका कास्टिंग डायरेक्टरने मला सांगितले की, जर मी त्याला माझे प्रायव्हेट पार्ट दाखवले तर तो मला चित्रपटात मुख्य भूमिका देईल”. पण मी सरळ असल्याचे त्याला आरामात सांगितले आणि मी त्याची ऑफर नाकारली.
आयुष्मान पुढे म्हणाला, “पूर्वी जेव्हा मी ऑडिशनसाठी जायचो तेव्हा तिथे सोलो टेस्ट घेतल्या जात होत्या. मात्र, अचानक तिथल्या लोकांची संख्या वाढली आणि एकाच खोलीत ५० लोक जमा झाले आणि मी विरोध केल्यावर मला हाकलून देण्यात आले, त्यामुळे मला नकारही सहन करावा लागला आहे”. अनेक वेळा अभिनेत्याला त्याच्या भुवया खूप झुडूप असल्याचे सांगून नाकारण्यात आले. मात्र, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याने कधीही हार मानली नाही आणि स्वत:च्या बळावर नाव कमावले.
आणखी वाचा – बायको व लेक घरीच, आई व बहिणीसह काशी विश्वनाथला पोहोचला अभिषेक बच्चन, वाद की आणखी काही?
आयुष्मान खुराना पुढे म्हणाला की, तो आपले अपयश सहज हाताळू शकतो. आयुष्मान म्हणतो की जर त्याने त्याच्या कारकिर्दीत अपयश पाहिले नसते तर कदाचित तो आज या पदावर नसता. अभिनेत्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, ‘विकी डोनर’ नंतर तो ‘दम लगा के हईशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘ड्रीम गर्ल’, ‘ड्रीम गर्ल २’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. याशिवाय त्याचे ‘गुगली’ आणि ‘छोटी सी बात’ हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.