सध्या भारतवासीयांच्या मनात एकच गोष्ट घर करुन बसली आहे ती म्हणजे भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेला वर्ल्डकप. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा सुवर्ण क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात लिहिला गेला. रोहित शर्मासह आणखी एका कलाकारासाठी हा क्षण अत्यंत महत्त्वाचा होता तो खेळाडू म्हणजे विराट कोहली. क्रिकेट विश्वात अनेक जुने रेकॉर्डस् मोडीत काढून काही नवीन रेकॉर्डस् बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचं नाव घेतलं जातं. वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराटचे अनेक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अनेक चाहत्यांनी विराटच्या भावनांवर आपलं प्रेम दर्शवलं. (Virat Kohli New Home In Alibaugh)
वर्ल्डकप नंतर विराट आपल्या कुटुंबासह परदेशात निवास करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं मात्र आता विराटच्या एका पोस्टने या सगळ्या अफवांना पूर्णविराम लावला आहे. विराटने अलिबाग येथे नुकताच एक आलिशान बंगला बांधला असून त्या बंगल्याला ‘विरान’ असे नाव देखील देण्यात आले आहे. याबाबतचा एक व्हिडीओ विराटने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरुन शेअर केला.
हे देखील वाचा- सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर बहीण-भावाच्या नात्यात फूट, भाऊ लव सिन्हाने शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री नाही, नक्की प्रकरण काय?
व्हिडीओ मध्ये विराटच्या या नवीन घराच्या बांधकामापासूनचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये विराटच्या बंगल्याची खास झलक देखील दाखवण्यात आली. सुंदर गार्डन, भव्य स्विमिंगपूल, आलिशान अशा किचन व हॉल तसेच अनेक सोयी सुविधांनी परिपूर्ण असा विराटचा नवीन बंगला त्याच्यासह चाहत्यांना देखील भुरळ पाडत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत विराट म्हणाला माझे अलिबागचे घर बनवण्याचा प्रवास हा एक अखंड सुंदर अनुभव आहे. आमच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणल्याबद्दल संपूर्ण टीमचे खूप खूप आभार. माझ्या प्रियजनांसह येथे प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही! (Virat Kohli New Home In Alibaugh)
हे देखील वाचा- मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा एकदा ईडीचे समन्स, चौकशीसाठी बोलावलं अन्…; अडचणीत वाढ होणार
तर आता विराट अनुष्का आणि मुलांसह अलिबागच्या नवीन बंगल्यामध्ये कधी जाणार हे पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक दिसत आहे. विराटच्या या व्हिडीओवर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि विराटचा सहकारी शार्दूल ठाकूर याने “चलो अलिबाग” अशी कमेंट देखील केली आहे. वर्ल्डकप विजयानंतर विराट कोहलीने टी ट्वेंटी फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करत चाहत्यांना दुःखद धक्का दिला. निवृत्तीच्या घोषणेनंतर देखील विराट कोहलीवर चाहत्यांचे असलेली प्रेम तिळभरसुद्धा कमी झाल्याचे दिसले नाही. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही अशक्य कामगिरी शक्य करुन दाखवली आणि प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान मिळवलं. दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत करुन भारताने वर्ल्डकप आपल्या नावी केला आणि सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली. आता विराट- रोहितची ही जोडी पुन्हा मैदानावर कधी दिसणार या बाबत देखील चाहते उत्सुक दिसत आहेत.