गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अरमान मलिकची पत्नी पायल मलिक पुन्हा ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये येणार?, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 10, 2024 | 5:43 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Payal Malik will be returning to Bigg Boss OTT season 3 due to a viral video.

अरमान मलिकची पत्नी पायल मलिक पुन्हा 'बिग बॉस ओटीटी'मध्ये येणार?, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यावेळी अनेक वादग्रस्त चेहरे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. या पर्वात युट्यूबर अरमान मालिकदेखील त्याच्या दोन्ही पत्नीबरोबर सहभागी झाला आहे. तिघांच्याही सहभागाने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. लोकांच्या कमी मतांमुळे, अरमानची पत्नी पायलला दुसऱ्या आठवड्यातच या शोमधून बाहेर काढण्यात आले. परंतु त्यानंतरही ती सतत चर्चेत राहिली. गेल्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये तिने घरात येऊन विशाल पांडेला त्याने कृतिकावर केलेल्या कमेंटबद्दल फटकारले. त्यानंतर घरात आणि घराबाहेर गोंधळ झाला असल्याचे पाहायला मिळाले.

पत्नीबद्दलच्या कमेंटवर चिडून अरमानने नॅशनल टीव्हीवर विशालला कानाखाली मारत पायलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. या सर्व घटनेमुळे शोच्या टीआरपीमध्ये चांगलीच वाढ झाली. त्यामुळे आता या शोचा टीआरपी वाढवण्याचे श्रेय फक्त पायलला जात असल्याच्या चर्चा रंगत आहेत आणि याच कारणामुळे निर्मात्यांनी त्याला पुन्हा बोलावले असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर पायल मलिकचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये पायलच्या शेजारी उभी असलेली एक महिला “ती (पायल) पुन्हा ‘बिग बॉस’मध्ये जाणार आहे आणि हे पहिल्यांदाच होत आहे” असं म्हणत आहे. याबरोबरच त्या महिलेने अरमान मलिकच्या कुटुंबाला पाठिंबा देण्याचे आणि मतदान करण्याचे आवाहनही केले आहे.

Ugh, what why? Wo Arman aur Kritika tolerate ho nahi rahe the, isko kise dekhna hai? #BiggBossOTT3

Wildcard ki hopes deke isse bhej rahe hai kya? Yeh jaake wahi #VishalPandey ka topic stretch karegi.#Naezy #LuvKataria #ElvishYadav #SaiKetanRao #SanaMakbul pic.twitter.com/0cy6nhEneM

— Blake (@blake_whothis) July 9, 2024

आणखी वाचा – मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा एकदा ईडीचे समन्स, चौकशीसाठी बोलावलं अन्…; अडचणीत वाढ होणार 

या व्हिडीओनंतर नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. खरंच पायलला वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून घरात आणले जाणार का? की या फक्त अफवा आहेत. अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. पायलने फक्त ‘वीकेण्ड का वार’मध्ये येऊनच घरात हंगामा केला होता तर ती आता पुन्हा या घरात आली तर ती नक्कीच विशाल पांडेचा बदला घेईल. असंही म्हटलं जात आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री व तिच्या पतीवर फसवणूकीचे गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…   

दरम्यान, गेल्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये पायल आली होती. तेव्हा तिने विशाल पांडेवर कृतिका मलिकबद्दल असभ्य कमेंट केली असल्याचे म्हटलं. यानंतर विशालने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, तो त्या अर्थाने बोलला नव्हता. त्यानंतर अरमान विशालशी बोलायला गेला आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. यात अरमानने विशालला कानाखाली मारली.    

Tags: Bigg Boss OTT 3Bigg Boss OTT 3 Newspayal malik
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
Urvashi Rautela Admit

उर्वशी रौतेला रुग्णालयात दाखल, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गंभीर दुखापत, नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.