बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण. सध्या ही जोडी त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. लवकरच दोघे आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियावरुन त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. तेव्हापासून ते दोघे चर्चेत आले असते. अशातच गर्भवती दीपिका पदुकोणचा एक फोटो सोशल मीडियावरुन समोर आला आहे. या फोटोने सोशल मिडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चर्चेत आलेल्या या फोटोमध्ये दीपिका पदुकोण ओरी आणि पती रणवीर सिंगबरोबर आहे. (Orry Touches Deepika Padukone Baby Bump)
समोर आलेल्या फोटोमध्ये ओरी दीपिकाच्या बेबी बंपला हात लावताना दिसत आहे. यावेळी त्याने अभिनेत्रीच्या होणा-या मुलाला आशीर्वाद दिले आहेत. ओरीने हा सुंदर फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि ओरीचा एकत्रित सुंदर असा फोटो राधिका मर्चंट व अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमधील आहे. नुकतेच या जोडप्याने अनंत व राधिकाच्या संगीत आणि हळदी समारंभाला हजेरी लावली होती. तासाभरात या फोटोवर कमेंट्स व लाईक्सचा वर्षाव झाला.
दीपिका व ओरीच्या या फोटोवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे की, “अखेर बाळाला आशीर्वाद मिळाला”. तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, “हा सर्वोत्तम फोटो आहे”. तर एकाने गमतीत म्हटलं आहे की, “बाळ आता ओरिफाइड आहे”. तर एका चाहत्याने “ओरी काका आशा करतो की भविष्यात तुम्ही आम्हाला दीपिका व रणवीरच्या बाळाचे फोटो दाखवाल”, असे म्हटले आहे. एका चाहत्याच्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे ते म्हणजे, “हे खूप महत्त्वाचे होते. मुलाला आशीर्वाद मिळाला आहे”.
दीपिका व रणवीरने २०१८ मध्ये लग्न केले आणि आता सहा वर्षानंतर ते आई-वडील होणार आहेत. या वर्षी सप्टेंबरमध्ये दीपिका तिच्या मुलाला जन्म देणार आहे. ओरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने ‘बिग बॉस १७’ मध्ये सलमान खानला सांगितले होते की, त्याला बॉलिवूडच्या प्रत्येक पार्टीला आमंत्रित केले जाते. तेथे सेलिब्रिटी त्यांना त्यांच्या पत्नी व मुलांसह फोटो काढण्यास सांगतात आणि ते सोशल मीडियावर शेअर करतात.