‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’मध्ये सध्या अरमान मलिक व विशाल पांडे यांच्यात जोरदार वाद सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. कृतिका मलिकची स्तुती करणं विशालला महागात पडलं आहे. अरमान मलिकच्या पत्नीला विशालने सुंदर असं म्हटल्याने अरमानचा राग अनावर झाला आणि त्याने विशालच्या कानशिलात लगावली. यामुळे सध्या ‘बिग बॉस’मध्ये तापलेलं वातावरण पाहायला मिळत आहे. यानंतर अरमानने पुन्हा एकदा विशालवर आपला राग व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये, नॉमिनेशनच्या वेळी कृतिका विशालच्या शेजारी बसल्यावर अरमानने यावर आक्षेप घेतला. (Arman Malik Angry On kritika malik)
यावर अरमानने त्याच्या पत्नीला विचारले, “इकडे ये, तुझे डोळे अजून उघडले नाहीत का?”. यावर उत्तर देत कृतिका म्हणाली की, “आता माझे डोळे उघडले आहेत”. लगेचच कृतिका तिथून उठून अरमान मलिकच्या शेजारी जाऊन बसते. त्यानंतर अरमान मलिक म्हणतो की, “मला अजूनही तू डोळ्यांवर पट्टी बांधल्याचे दिसत आहे. तुझ्यासाठी एक लेन्सचा चष्मा बनवावा लागेल”. कृतिका मलिक म्हणते, “तिथे शिवानीच्या शेजारी जागा होती म्हणून मी जाऊन बसले”.
Armaan Malik Gets Angry on Kritika Bhabhi Because she sit with Luv Kataria and Vishal side 🤣🤣
— Anuj Prajapati (@anujprajapati11) July 8, 2024
Aur Ye Khud ko Individual bolte hai 🤣🤣#VishalPandey #LuvKataria #ArmaanMalik #KritikaMalik #PayalMalik #BiggbossOTT3 #BBOTT3 #Vishalians #ElvishArmy𓃵 pic.twitter.com/mauFjsUXEl
अरमानबाबत कृतिकाने गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या निदर्शनास आणून दिले. तरीसुद्धा अरमान कृतिकावर रागावला होता आणि म्हणाला, “मला माहित नव्हतं आणि मला जे दिसलं ते मी बोललो. मला असं वाटतं की तू माझ्याबरोबर नाही आली आहेस.अरमानची पहिली पत्नी पायल मलिकने विशालवर कृतिकासाठी अनुचित टिप्पण्या केल्याचा आरोप केल्यानंतर राग व्यक्त केला.
जेव्हा या दोघांनी याबद्दल बोलले तेव्हा विशालने लवकेश कटारियाला अरमानच्या दुसऱ्या पत्नीबद्दल जे सांगितले होते ते पुन्हा सांगण्यास सांगितले. यामुळे अरमान नाराज झाला आणि त्याने विशालच्या कानाखाली मारली. तेव्हापासून, विशालच्या कुटुंबासह सोशल मीडियावर अरमानच्या विरोधात बोललं जात आहे. तर काही नेटकऱ्यांनी अरमानला याची शिक्षा व्हायला हवी आणि त्याला घरातून बाहेर काढायला हवे असेही बोलले जात आहे.