‘हा माझा बायको पार्वती’ हा डायलॉग ऐकल्यानंतर, साडीतल्या वेशातील पुरुषाला बघितल्यावर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आपसूकच हसू उमटत, असे जेष्ठ विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. त्यांनी कोणत्याही चित्रपटात पंचलाईन मारल्यानंतर प्रेक्षक हसल्याखेरीच राहिलाच नाही. म्हणून च लक्ष्मीकांत म्हणायचे चित्रपटगृहातील २०० प्रेक्षक हसण्यापेक्षा संपूर्ण चित्रपटगृहातील प्रेक्षक हसले, तर तो खरा विनोद असतो. त्यांच्या याच विनोदी अभिनयामुळे प्रेक्षकांचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते. एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या लोकप्रियतेचा एक किस्सा शेअर केला होता. (Laxmikant Berde Car Incident)
‘एक होता विदूषक’ ह्या चित्रपटाच्या शूटिंगवेळेस चा हा किस्सा आहे. या चित्रपटात लक्ष्मीकांत स्टार झाल्यानंतर त्यांची आई देवाघरी गेली असून चित्रपटात त्यांचा १०वा नदीकाठी असल्याचं दाखवण्यात आलं होतं. हा सीन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिग्दर्शकाला हवी होती. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी चित्रपटाच्या शूटिंग ची जाहिरात पेपर मध्ये दिली होती. त्यामुळे लक्ष्मीकांत यांचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग इथे उपस्थित राहिला होता.

लक्ष्मीकांत त्यांची नवीन कार यावेळी शूटिंग ला घेऊन आले होते. तेव्हा लक्ष्मीकांत यांच्या गाडीवर चाहत्यांनी हल्ला केला होता. त्यावेळेस लक्ष्मीकांत यांनी शक्कल लढवली आणि गाडी चावीसोबत तिथे आलेल्या चाहत्यांना देऊन टाकली, पुढे ते म्हणाले ही गाडी माझी नाही आहे. ही गाडी मी तुमच्यामुळे कामवाली आहे, तुमच्याकडून मिळालेल्या पैशांमुळे कमावली आहे. असं बोलल्यानंतर तेथील काही धड धाकट माणसांनी सर्व प्रेक्षकांना तेथून बाजूला काढले आणि लक्ष्मीकांत यांना जायला वाट दिली होती. (Laxmikant Berde Car Incident)
हे देखील वाचा: प्रसादला ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार’- हा पुरस्कार माझ्या बाबांना समर्पित
लक्ष्मीकांत यांची लक्षात राहण्यासारखी ‘कारकीर्द’
मायबाप आम्ही खांदा हलविला, तुम्ही हसलात.आम्ही केसावरून हात फिरवला तेव्हा पण तुम्ही हसलात पण तुम्हाला हसवता हसवता आम्ही घनदाट जंगलात कधी जाऊन पोहोचलो आमचं आम्हालाचं कळालं नाही. हा “एक होता विदूषक” या चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे यांचा डायलॉग चित्रपट इतकाच लोकप्रिय झाला. आज जरी लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यात नसले तरी सुद्धा लक्ष्मीकांत हे विनोदाचे बादशाह म्हणून च ओळखले जातील. लक्ष्मीकांत यांचे अनेक चाहते म्हणतात, जो पर्यंत या धरतीवर सूर्य चंद्र दिसतील तोपर्यंत लक्ष्मीकांत बेर्डे (लक्षा) हे नाव कधीच मिटणार नाही.
हे देखील वाचा: ‘पॅरिसमध्ये असताना अनिकेत वर हल्ला झाला होता आणि…..’अशोक सराफ यांनी सांगितला मुलासोबत घडलेला तो प्रसंग!
लक्ष्मीकांत बेर्डे म्हणायचे कोणतीही विनोदी भूमिका करताना, आपल्या समोर असलेल्या सहकलाकाराचा प्रतिसाद सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो. त्यामुळे विनोद हा एकट्याने कधीच होत नाही. लक्ष्मीकांत यांच्या अप्रतिम उपजात बुद्धिमत्तेमुळे त्यांना त्यांचे सहकलाकार आज सुद्धा लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण काढतात. (Laxmikant Berde Car Incident)