झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. दमदार स्टारकास्ट आणि रंजक कथानकामुळे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. या मालिकेतील अक्षरा-अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी लगेच आपलंसं करुन घेतलं आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अक्षराची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारत आहे. तर, अधिपतीच्या भूमिकेत अभिनेता ऋषिकेश शेलार झळकत आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षराने आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यामुळे अक्षरा-अधिपती या दोघांमधलं नातं आता बहरतं आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
मात्र या दोघांत अडथळा आणण्यासाठी भुवनेश्वरीने अधिपती-अक्षरा यांना घराच्या बाहेर काढले आणि त्यांना घरण्याचे नाव न लावता त्यांचा संसार करायला सांगितले आहे. यानंतर अधिपती व अक्षरा यांनी त्यांच्या नव्या संसारालाही सुरुवात केली आहे. पैशांसाठी ते काही ना काही प्रयत्न करत आहेत. संसारासाठी अधिपतीने कुस्तीही खेळली. याशिवाय त्यांनी शेतीही केली. संसारासाठी अथक प्रयत्न केल्यानंतर त्यांनी भुवनेश्वरीने त्यांना दिलेल्या परीक्षेत ते आता यशस्वी झाले आहेत. दोघांनी त्यांचे हे दहा दिवस पूर्ण केले असून ते आता पुन्हा त्यांच्या घरी गेले आहेत आणि घरी जाताच चारुहास यांनी अधिपती-अक्षराचे स्वागतही केलं आहे. मात्र चारुहंस यांनी या विजयाचे सेलिब्रेशन झालं पहिले असं म्हटलं आणि अधिपतीला हे काय आवडलं नाही.
आणखी वाचा – लग्नाचा खेळ! घटस्फोटानंतरही बायकोबरोबर एकत्र वेळ घालवत आहे सुष्मिता सेनचा भाऊ, म्हणाला, “मला तिच्याबरोबर…”
अधिपती त्याला हे काही मान्य नसल्याचे म्हणतो. मात्र त्याची आई भुवनेश्वरी त्याला याबद्दल मनवते आणि केवळ आईमुळे तो या सेलिब्रेशनसाठी हो म्हणतो. हीच गोष्ट अक्षरालादेखील पटली नसल्यामुळे ती अधिपतीला असं म्हणते की, “आपण परत आल्याचा त्यांना आनंद झाला आहे. आपण जिंकून आलो म्हणून त्यांनी हे सगळं केलं. ते तुमचे वडील आहेत. तुमच्या मनात त्यांच्याविषयी अडी असली तर त्यांच्या मनात तसं काही नाही. तुमच्यासाठी ते वाट्टेल करतील”.
यापुढे ती अधिपतीला चारुहासबद्दल समजावताना असं म्हणते की, “जेव्हा आपल्याला वाटतं की समोरच्या माणसाने आपल्याशी नीट वागावं तेव्हा त्यांना विरोध करण्यापेक्षा आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग हळूहळू तेदेखील बदलतील. बाबांनी आपल्यासाठी इतकं केलं आणि तुम्ही त्यांची छोटीशी इच्छादेखील पूर्ण केली नाहीत. तर त्यांना वाईट वाटेल”. त्यामुळे आता अक्षरा अधिपतीचे मन वळवण्यात यशस्वी होणार का? हे आगामी भागांत पाहायला मिळेल.