‘कसौटी जिंदगी की’ ही टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय झालेली मालिका आणि याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. या मालिकेतील तिची प्रेरणा ही भूमिका चांगलीच गाजली होती. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. टेलिव्हिजन, चित्रपट व ओटीटीद्वारे प्रेक्षकांचे मने जिंकणारी अभिनेत्री श्वेता तिवारीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. श्वेता ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत खूप लोकप्रियता मिळवली आहे. श्वेताच्या टीव्हीमधील यशस्वी कारकिर्दीनेच तिचे नशीब बदलले.
अभिनेत्री श्वेता तिवारीने आतापर्यंत तिच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. तथापि, अभिनेत्रीने कधीही हार मानली नाही आणि प्रत्येक समस्येचा धैर्याने सामना केला. श्वेताने नुकताच तिच्या खाजगी आयुष्याबद्दल खुलासा केला. यावेळी तिने , “माझी प्रेमात अनेकदा फसवणूक झाली आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींनंतर मी पहिला पती राजा चौधरीबरोबर घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यापासून स्वतःला रोखले होते” असं म्हटलं.
गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत श्वेता तिवारी असं म्हणाली की, “ज्यांनी माझी फसवणूक केली आहे त्यांना आता पश्चाताप होत आहे. जेव्हा पहिल्यांदा नात्यात फसवणूक झाली तेव्हा मी रडली होती तेव्हा मी देवाला हे फक्त माझ्याबरोबरचं का होतं? असं म्हटलं होतं. हेच माझ्याबाबत दुसऱ्यांदा घडले तेव्हा मला कळले की, ही वेदना कधीच दूर होणार नाही हे असंच राहणार आहे. माझ्या कुटुंबात मीच प्रेमविवाह केला होता. त्यामुळे लोक माझ्या आईला खूप टोमणे मारायचे आणि माझ्या लग्नालाबद्दलही अनेक चर्चादेखील करायचे”.
आणखी वाचा – लग्नाचा खेळ! घटस्फोटानंतरही बायकोबरोबर एकत्र वेळ घालवत आहे सुष्मिता सेनचा भाऊ, म्हणाला, “मला तिच्याबरोबर…”
श्वेता पुढे म्हणाली की, “जेव्हा एखाद्या व्यक्तीबरोबर तिसऱ्यांदा विश्वासघात होतो तेव्हा त्याचा परिणाम व्यक्तीवर होणे थांबते. जेव्हा कोणी माझा विश्वासघात करतो किंवा मला दुखावतो. तेव्हा मी याबाबत कोणाकडेही तक्रार करत नाही, उलट स्वत:ला त्यापासून वेगळे करते”. दरम्यान, श्वेताने १९९८ मध्ये अभिनेता राजा चौधरीबरोबर लग्न केले होते. श्वेताने राजा चौधरीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. मग २००७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मग श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केले. तिच्या या दुसऱ्या लग्नातही अडचणी येऊ लागल्या.