‘बिग बॉस ओटीटी ३’ ची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आजकाल ‘बिग बॉस’च्या घरात तापलेलं वातावरण पाहायला मिळत आहे. कृतिकाला सुंदर म्हटल्यानंतर अरमान मलिकने थेट विशालच्या कानशिलात लगावली. यामुळे सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. या कालावधीत ‘बिग बॉस’ने अरमानला घरातून बाहेर काढले नसले तरी ‘बिग बॉस’मध्ये कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जात नाही. या अपघातानंतर अरमान व कृतिका यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र, नुकताच या कपलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोघेही खूप रोमँटिक झालेले दिसत आहेत. (Arman Malik And Kritika Malik Rommance)
‘बिग बॉस’च्या फॅन क्लबवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अरमान व कृतिका ‘बिग बॉस’च्या घरात सुरु असलेल्या गाण्यावर रोमान्स करताना दिसत आहेत. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अरमान व कृतिका बेडवर एकमेकांच्या मिठीत झोपले होते आणि बेडवर एकमेकांना मिठी मारून रोमान्स करत होते. दुसऱ्या क्लिपमध्ये ते एकमेकांचा हात पकडून नाचताना दिसले. यानंतर दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात. दोघेही रोमँटिक होऊ लागतात त्यावेळी कृतिका तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते. मात्र, अरमान पुन्हा तिला स्वतःकडे खेचताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी अरमान व कृतिकामध्ये विशालमुळे मोठा वाद झाला होता आणि त्याने कृतिकाला सुंदर म्हटले होते, ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. मात्र, आता दोघांमधील हा वाद दूर झाला असून त्यांच्या नात्यात सुधारणा होत असल्याचं दिसत आहे. दोघेही एकत्र येत रोमान्सही करताना दिसले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक चाहते दु:खी झाले आहेत, कारण ते पायलला मिस करत आहेत. नेटकऱ्यांचे असं म्हणणे आहे की, अरमान पायलला अजिबात मिस करत नाही आणि तो कृतिकाबरोबर आनंदी आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले आहे की, “अरमान पायलबरोबर हे सर्व करत नाही”. त्यांनतर दुसऱ्या एका नेटकऱ्याने असं लिहिलं आहे की, “हे सगळं करशील तर पायलला हेवा वाटेल”. तर तिसऱ्या यूजरने लिहिले की, “आता अरमानमुळे मला ‘बिग बॉस’ पाहण्याची इच्छा होत नाही”.