शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एवढा मोठा नट असूनही…”, उषा नाडकर्णींकडून साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “पॅकअपच्या दिवशी…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 7, 2024 | 6:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Veteran Marathi actress Usha Nadkarni praised South Superstar Vijay Sethupathi and his simplicity.

“एवढा मोठा नट असूनही...”, उषा नाडकर्णींकडून साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “पॅकअपच्या दिवशी...”

मराठी मनोरंजन विश्वात छोट्या पडद्यासह मोठा पडदा गाजवणारं मोठं नाव म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी. ‘सिंहासन’ या मराठी चित्रपटातून उषा ताई यांनी झगमगत्या दुनियेत पाऊल ठेवले आणि नंतर मागे त्यांनी वळून पाहिले नाही. १९९९ मध्ये त्यांनी चित्रपटांनंतर मालिकेत एण्ट्री घेतली. मग मराठी नाटक, चित्रपट व मालिका यांमध्ये काम करत उषा नाडकर्णी यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. त्यांच्या याच अथक मेहनतीमुळे त्यांना बॉलिवूडमध्येही अनेक नावाजलेले कलाकार आणि दिग्दर्शक ओळखतात. मराठी, हिंदीमधील कलाकार व दिग्दर्शकांबरोबर काम केल्यानंतर नुकतंच त्यांनी साऊथचा सुपरस्टार विजय सेतूपतीबरोबरही काम केले.

याबद्दल उषा नाडकर्णी यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात भाष्य केलं. ‘गांधी टॉक्स’ या चित्रपटात उषा नाडकर्णी व विजय सेतुपती यांनी एकत्र काम केले असून यात उषा यांनी विजयच्या आईची भूमिका साकारली आहे. यावेळी विजयच्या वागणुकीमुळे व त्याच्या साध्या स्वभावामुळे उषा नाडकर्णी त्याच्यावर खूपच खुश झाल्या. साऊथचा सुपरस्टार असलेल्या विजयचा साधेपणा उषा ताई यांना अतिशय भावला असून यावेळी विजयचे कौतुक करण्यात त्या अजिबात थांबल्या नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – गायब झाल्यानंतर गुरुचरण सिंह पुन्हा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये पुन्हा परतणार का? अभिनेता उत्तर देत म्हणाला, “निर्मात्यांनी पैसे…”

याबद्दल बोलताना उषा नाडकर्णी यांनी असं म्हटलं की, “‘गांधी टॉक्स’ या चित्रपटात मी विजयच्या आईची भूमिका केली आहे. साऊथचा सुपरस्टार असूनही तो अगदीचं साधा आहे. आपल्याकडे मराठीत किंवा हिंदीत इतकूसं काम केलं तरी माज दाखवतात. पण तो इतका मोठा माणूस असूनही जमिनीवर बसतो. आम्ही दोघे माय-लेक असून चित्रपटाच्या दरम्यान खूप गप्पा मारल्या आणि तो इतका साधा आहे की, लोकांनी त्याच्याकडून शिकलं पाहिजे. पॅकअपच्या दिवशीही त्याने मला नमस्कार केला तेव्हा मी पण त्याचे गाल ओढले. एवढा मोठा नट असूनही त्याला अजिबात माज नाही”.

आणखी वाचा – Video : बाप तो बापच! चारुहासला वाटतोय आपल्या लेकाचा अभिमान, अधिपतीला कळणार का बापाचं प्रेम?

दरम्यान, ‘गांधी टॉक्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन किशोर बेळेकर यांनी केले आहे. झी स्टुडिओज, क्युरियस डिजिटल आणि मूव्ही मिल एंटरटेनमेंट यांची सहनिर्मिती असलेला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात विजय सेतुपतीबरोबर अभिनेता सिद्धार्थ जाधव, अरविंद स्वामी, आदिती राव हैदरी यांच्यासह उषा नाडकर्णी यांचीही प्रमुख भूमिका आहेत. ‘गांधी टॉक्स’ हा एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे.

Tags: marathi entertainment newsUsha NadkarniUsha Nadkarni praised Vijay SethupathiVijay Sethupathi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
08 july 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

सोमवारी ‘वृषभ’ राशीच्या लोकांसाठी नोकरीत आहेत बढतीचे योग, तर ‘मकर’ राशीच्या लोकांची होणार शैक्षणिक प्रगती, जाणून घ्या...  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.