छोट्या पडद्यावरील वादग्रस्त तरीही तितकाच लोकप्रिय असलेला शो म्हणजे ‘बिग बॉस’. छोट्या पडद्यावरील हा ‘बिग बॉस’ आता ओटीटीद्वारेही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यंदाचे हे बिग बॉस ओटीटीचे तिसरे पर्व असून हा शो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी अनेक वादग्रस्त चेहरे या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळत आहेत. बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीदेखील यंदाच्या ‘बिग बॉस’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाला आहे.
‘बिग बॉस’च्या प्रत्येक पर्वातील घरात सिगरेट ओढण्यासाठी एक वेगळी जागा असते, जिथे स्पर्धक धूम्रपान करु शकतात. कोणालाही घरामध्ये सिगरेट ओढण्याची परवानगी नसते. हा या शोचा एक मोठा नियम आहे, पण ‘बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वात रणवीर शौरी हा नियम तोडताना दिसला. अभिनेता रणवीर शौरी घराच्या आत सोफ्यावर बसून सिगरेट ओढताना दिसला होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘बिग बॉस’ने त्याला असे करण्यापासून रोखलेही नाही.

रणवीर शौरी हा एक बॉलिवूड अभिनेता आहे. प्रवेश करण्यापूर्वी त्याने होस्ट अनिल कपूरला सांगितले होते की, त्याच्याकडे काम नाही, त्यामुळेच त्याने या शोमध्ये प्रवेश केला आहे. शोमध्येही तो अनेक कारणांनी चर्चेत राहतो. आपले मत ठामपणे व्यक्त करतो. नुकतेच कठपुतळ्यांबरोबर मिमिक्री करण्याची त्याची शैलीही या शोमध्ये खूप आवडली होती. परंतु तो आता प्रेक्षकांच्या निशाणावर आला आहे. रणवीर शौरीने घरात बसून सिगरेट ओढली आहे. म्हणजेच या शोचा एक मोठा नियम मोडला आहे.
आणखी वाचा – गुरुवारी मिथुन व कन्या राशींचे भाग्य उजळणार,नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होणार, व्यवसायातही होणार लाभ
लाईव्हमध्ये रणवीर शौरी साई केतन रावबरोबर सोफ्यावर बसला आहे. त्याच्या हातात सिगरेटही स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे त्याच्या या सिगरेट ओढण्याच्या कृतीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, ‘बिग बॉस १६’मध्ये साजिद खान अनेकवेळा सिगरेट ओढताना दिसला होता. जेव्हा प्रेक्षकांनी निर्मात्यांवर टीका केली, तेव्हा ‘बिग बॉस’ने साजिदला अनेकदा फटकारले होते. त्यामुळे आता ‘बिग बॉस’ रणवीरवर काय कार्यवाही करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.