सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर करत कायमच सक्रीय असणाऱ्या कलाकारांपैकी एक मराठी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. क्रांती ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिचे अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती तिच्या लेकींचे मजेशीर व्हिडिओही पोस्ट करत असते. त्यांच्या अनेक करामती ती व्हिडिओद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असते आणि तिच्या या व्हिडिओला चाहत्यांकडूनदेखील उत्तम प्रतिसाद मिळत असतो. अशातच क्रांतीने नुकताच आणखीन एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे.
क्रांतीने तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडीओद्वारे तिने वडिलांच्या वाढदिवसाची खास झलक दाखवली आहे. यामध्ये क्रांतीचे वडील तिच्या आई व मुलीसह केक कापतानाचे पाहायला मिळत आहे. तसेच क्रांतीची आई व वडिलांमधील खास प्रेमदेखील या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. त्यांच्यातील या खास प्रेमाबद्दल क्रांतीसह तिच्या अनेक चाहत्यांनी कौतुक केलं आहे. क्रांतीने तिच्या आई-वडिलांबद्दलच्या या भावना खास शब्दांत व्यक्त केल्या आहेत. क्रांतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे आई-वडिलांचा हा खास व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओखाली कॅप्शनमध्ये क्रांतीने असं म्हटलं आहे की, “आम्ही माझ्या वडिलांचा ८४वा वाढदिवस साजरा केला अंमई यावेळी ते त्यांच्या ‘लाइफलाइन’ म्हणजेच त्यांच्या पत्नीबरोबर होते. खरं तर ते एकमेकांना पूर्णत्व देतात आणि यालाच मी खऱ्या अर्थाने ‘लग्न’ म्हणते. जगात जिथे लोक एकमेकांचा सहज त्याग करतात तिथे हे दोघे एकममेकांबरोबर कायम आहेत. “मला तुझ्याबरोबर म्हातारे व्हायचे आहे” असे आपण म्हणतो त्याचे ते एक परिपूर्ण उदाहरण आहेत. जेव्हा मी माझे आशीर्वाद मोजते, तेव्हा मी दररोज देवाचे आभार मानते की, ते अजूनही माझ्याबरोबर आहेत. माझे पालक या नात्याने हे दोन अतिशय अद्भुत लोक मिळाल्याबद्दल मी देवाची कायम कृतज्ञ आहे”.
दरम्यान, क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली तिच्या अनेक चाहत्यांनीही तिच्या वडिलांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडीओखाली चाहत्यांनी “आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील चेहऱ्यावरील हास्य पाहणे हे सुख आहे”, “असाच गोडवा कायम राहू देत ही प्रार्थना”, “वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा”, “ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.