दिवसेंदिवस बदलत जाणाऱ्या परिस्थती मध्ये कोणासोबत कधी कोणता प्रसंग घडेल, कोणाला कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल सांगता येत नाही. सामान्य माणूस असो वा कलाकार काळ कोणासाठी ही थांबत नाही. एकामागून एक येणाऱ्या संकटाना सध्या सामोरी जात आहे मराठी चित्रपसृष्टीतील अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. बिग बॉस मधून अपुर्वाची हळवी बाजू तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाली. नुकतच तिच्या सख्ख्या भावाच दुःखद निधन झाल्यामुळे तिच्यावर दुखः चा डोंगर कोसळला. (Apurva Nemlekar sister)

त्यातून सावरत असताना अपूर्वा ने अजून एक पोस्ट करत तिची बहीण सुद्धा आजारी असल्याचं सांगितलं आहे. तिने बहिणी सोबत फोटो पोस्ट करत तिने म्हणलं आहे की एकामागे एक संकट येत आहेत पण माझा प्रार्थने वर खूप विश्वास आहे. लवकरच तू बरी होशील, सर्वकाही ठीक होईल असं कॅप्शन मध्ये लिहिलं आहे.

चांगल्या, वाईट काळात पाठिंबा देणाऱ्या तिचे चाहते या वेळी सुध्दा कमेंट्स करत अपूर्वाला धीर देताना दिसतायत.’स्वामी सगळं ठीक करतील ‘ , ‘ काही काळजी करू नकोस स्वामी तुला या संकटातून बाहेर काढतील ‘अशा कमेंट्स करत चाहत्यांनी अपूर्वा ला धीर दिला आहे.(Apurva Nemlekar sister)
हे देखील वाचा – तब्बल ३० वर्षांनी समोर आले ‘झपाटलेला’ चित्रपटाचे कधी ही न पाहिलेले फोटोज
अपूर्वा नेमळेकर बिग बॉस मराठी सीझन ४ मधून नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आली. यापूर्वी तिने मराठी चित्रपट, झी मराठी वरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चाले अशा अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. लवकरच रावरंभा या ऐतिहासिक चित्रपटात ती शाहीन आपा ही भूमिका साकारताना दिसणार आहे.