शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लीला-एजेचा रोमँटिक अंदाज, लग्नाच्या रिसेप्शनमधील दोघांच्या लूकने वेधलं लक्ष, मोठ्या मंगळसूत्राने वेधलं अधिक लक्ष

Saurabh Moreby Saurabh More
जून 28, 2024 | 1:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerala fame Leela and AJ shared a romantic video on social media know more

Video : लीला-एजेचा रोमँटिक अंदाज, लग्नाच्या रिसेप्शनमधील दोघांच्या लूकने वेधलं लक्ष, मोठ्या मंगळसूत्राने वेधलं अधिक लक्ष

छोट्या पडद्यावरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेत येणाऱ्या अनेक रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. एजेंच्या व लीला यांच्या मनाविरुद्ध त्यांचं लग्न झालं आहे. मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढत आहे. या मालिकेत राकेश बापट हा एजे म्हणजे अभिराम जहागीरदार व वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारत आहे. मनाविरुद्ध सुरु झालेल्या एजे व लीला यांच्या लग्नामुळे त्यांच्यातील प्रेमकहाणी आता कोणतं वळण घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. 

एजे व लीला हे दोघे मालिकेत एकमेकांच्या विरुद्ध असले, त्यांचे मालिकेत एकमेकांबरोबर जमत नसले तरी ते पडद्यामागे खूपच मजामस्ती करतात.  दोघे सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात आणि ते अनेकदा त्यांचे पडद्यामागील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात त्यांची ही पडद्यामागची मजामस्ती चाहत्यांनाही चांगलीच आवडते. दोघे सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच त्यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लीला व एजे यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे दोघांचा एक नवीन व्हिडीओ शेअर  केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Raqesh Bapat (@raqeshbapat)

आणखी वाचा – Video : नवऱ्याच्या ‘त्या’ वागण्यामुळे आरती सिंहचा राग अनावर, रागाच्या भरात केलं असं कृत्य, व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये एजे व लीला यांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये एजे लीलाला आपल्या मिठीमध्ये घेत आहे. त्यांच्या या खास व्हिडीओमध्ये एजेनने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. तर लीलाने लाल रंगाची सुंदर साडी नेसली आहे. सुंदर वेणी, गळ्यात मोठा नेकलेस त्यावर मोठे मंगळसूत्र, हातात लाल बांगड्या आणि केसांत पांढऱ्या रंगाचे फूल असा खास लुक केला आहे. दोघेही एकमेकांबरोबर खूपच सुंदर दिसत आहेत.

आणखी वाचा – “बॉयफ्रेंड व फ्रेंडमध्ये फरक काय?” आदिनाथच्या कोठारेच्या लेकीने त्याला विचारला वेगळाच प्रश्न, म्हणाला, “बरेच लोक…”

मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एजे व लीला यांनी हा खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ चाहत्यांच्याही चांगलाच पसंतीस पडला आहे. या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “दोघेही खुप छान दिसत आहेत, किती गोड, तुमची मालिका खूप आवडते” अशा अनेक कमेंट्सद्वारे या व्हिडीओला चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे.   

Tags: marathi entertainment newsmarathi serialNavri Mile Hitlerala
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Saregamapa fame singer Mugdha Vaishampayan shared video of Dattaguru bhajan at home in Aravali

Video : मुग्धा वैशंपायनचं सासरकडचं घर आतून आहे असं, प्रवेश करताच दत्तगुरुंचं छोटं मंदिर, प्रसन्न वातावरण अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.