शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बॉयफ्रेंड व फ्रेंडमध्ये फरक काय?” आदिनाथच्या कोठारेच्या लेकीने त्याला विचारला वेगळाच प्रश्न, म्हणाला, “बरेच लोक…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 28, 2024 | 11:25 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Adinath Kothare's daughter Jija asked him "What is the difference between a boyfriend and a friend?" question

"बॉयफ्रेंड व फ्रेंडमध्ये फरक काय?" आदिनाथच्या कोठारेच्या लेकीने त्याला विचारला वेगळाच प्रश्न, म्हणाला, "बरेच लोक..."

मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री उर्मिला कोठारे व अभिनेता आदिनाथ कोठारे यांची जोडी सध्या फारशी कुठे एकत्र दिसत नाही. मात्र तरीही या जोडीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. या दोघांना एक गोड मुलगीही आहे, जिचं नाव आहे जिजा. सोशल मीडियावर संपुर्ण कोठारे कुटुंबियांप्रमाणेच या घरातील सर्वात छोटी सदस्य जिजा कोठारेदेखील लोकप्रिय आहे. जिजाचा निरागसपणा नेहमीच चाहत्यांची मनं जिंकतो. तिचे आईबाबा म्हणजेच उर्मिला आणि आदिनाथ अनेकदा जिजाबरोबरचे सुंदर फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात.

आदिनाथ गेले अनेक दिवस जिजा आणि त्याच्यामधील सुंदर नात्याबद्दल काही ना काही लिहित आहे. ‘जिजा आणि डॅडा’ अशा शीर्षकाखाली आदिनाथ त्याचे जिजाबरोबरचे अनेक संवादात्मक परिच्छेद सोशल मीडियावर शेअर करत असतो. हे संवाद प्रेक्षकांना वाचायलाही खूप आवडतात. आदीनाथ व जिजामधील हे संवाद रोजच्या जगण्यातल्या अगदी साध्या-साध्या गोष्टींवर भाष्य करणारे असतात. जिजाबरोबरचे असे अनेक किस्से व मनाला भिडलेल्या गोष्टी आदिनाथनं कागदावर उतरवल्या आणि सोशल मीडियावर पोस्ट केल्या. अनेक चाहते या खास संवादाला लाइक्स व कमेंट्सच्या माध्यमातून पसंती दर्शवातात.

View this post on Instagram

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare)

आणखी वाचा – प्रतिबिंब शक्तीबद्दल माहिती झाल्यानंतर रुपालीकडून नेत्राला बाळाच्या जीवाबद्दल धमकी, काय असेल नेत्राचं पुढचं पाऊल?

अशातच अनेक दिवसांनी आदिनाथने जिजाबरोबरचा खास संवाद पोस्ट केला आहे. यामध्ये जिजा आदिनाथला “डॅडा बॉयफ्रेंड आणि फ्रेंडमध्ये काय फरक असतो?” असा प्रश्न विचारते. यावर आदिनाथ गप्प बसतो. मग ती पुन्हा “डॅडा सांग ना” असं म्हणते. यावर आदिनाथ पुन्हा गप्पच बसतो. मग जिजा पुन्हा त्याला याबद्दल विचारते. तेव्हा आदिनाथ “अगं काही नाही दोन्ही सारखेच असतात” असं म्हणतो.

आणखी वाचा – Video : नवऱ्याच्या ‘त्या’ वागण्यामुळे आरती सिंहचा राग अनावर, रागाच्या भरात केलं असं कृत्य, व्हिडीओ व्हायरल

या पोस्टखाली आदिनाथने खास कॅप्शनही लिहिलं आहे. यामध्ये आदिनाथने असं म्हटलं आहे की, “बरीच लोकं मला विचारत असतात, “अरे तू ते #जीज़ाआणिडॅडा का लिहीत नाहीस हल्ली?” तर त्यचं उत्तर असं आहे की हल्ली माझ्या मुलीच्या प्रश्नांची माझ्याकडे उत्तरच नसतात. असो. मला वाटतं तेही तुम्हाला आवडेल वाचायला. तर मग असा एक प्रयत्न करून बघू”.  दरम्यान, आदिनाथच्या या पोस्टवर अनेक कलाकार व चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्यांना ही पोस्ट आवडली असल्याचेही म्हटलं आहे.

Tags: Adinath and Jijaadinath kotharejija kotharemarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Tharal Tar Mag Serial Update

प्रियाने सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर आणलं, खोटा पुरावा समजून पूर्णा आजींनी तिच्याच कानाखाली लगावली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.