टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आरती सिंह ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच आरती दीपक चौहानबरोबर लग्नबंधनात अडकली. आरती सिंगचे लग्न होऊन दोन महिने झाले आहेत. तिच्या लग्नासाठी मनोरंजन क्षेत्रातील सर्व कलाकारमंडळी उपस्थित होते. मामा गोविंदादेखील आरतीच्या लग्नात सहभागी झाला होता. लग्नानंतर ती हनिमूनसाठी पॅरिसला गेली होती आणि ती आता मुंबईत परतली आहे. अभिनेत्रीचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने नवऱ्याला एक तास उशिरा आल्याबद्दल फटकारले आहे. तिला खूप राग आला होता, पण तिच्या पतीने तिला ज्या प्रकारे शांत केले ते पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
सोशल मीडियावर आरतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या नवऱ्यावर प्रचंड रागावली असल्याचे दिसत आहे. तसेच तिच्या रागाण्यामुळे तिचं क्युट अंदाजही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आरती आपल्या घरात आहे. मग तिचा नवरा येतो आणि तिला विचारतो की, त्याने असे काय केले की त्यामुळे आरतीला राग आला आहे. त्यावर आरतीने “तुला ४.३० वाजता यायला सांगितले होते” असं म्हणते. यावर दीपक म्हणतो की, “त्याला फक्त एक तास उशीर झाला आहे”. हे ऐकून आरती म्हणते “एक तासही खूप जास्त आहे”.

आणखी वाचा – वृषभ, मिथुन व धनु राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस आहे खास, सुप्त इच्छा होतील पूर्ण, जाणून घ्या…
मग दिपकने “या वेळेत तुला काय करता आले नाही” असे विचारल्यावर आरती रागाने म्हणते, “तुझ्यामुळे मी एक टास् बसून आहे. मी जिमलाही गेले नाही. घरीच बसून राहिले” यावर दीपक पुन्हा “मी शिक्षा भोगायला तयार आहे” असं म्हणताच तुला मी मारेन” असं आरती म्हणते. नवरा एक तास उशिरा आल्याने आरती त्याच्यावर रागावली असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आरतीचा राग खूपच क्यूट दिसत असला तरी दुसरीकडे नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत.
एकाने कमेंट करत “सांगा ही काय वेळ आली आहे, नवरा तिला ‘तुम्ही’ म्हणत आहे आणि पत्नी ‘तू’ म्हणत आहे” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “पतीशी अशाप्रकारे बोलणे खूपच विचित्र आहे” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने “तो पती नव्हे तर तुझा गुलाम झाला आहे” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी आरतीच्या या वागण्याला ‘ओव्हर ॲक्टिंग’ म्हटलं आहे.