‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागात रुपालीला प्रतिबिंब शक्तीचा वापर करताना बघितले होते. त्यानंतर शेखरने त्या श्लोकाचे वाचन करताच त्याच्या डोळ्यातून रक्त येऊ लागले. अशातच आजच्या भागात शेखरच्या डोळ्यातून रक्त येण्यामागे तो श्लोक असल्याची खात्री घरातील सर्वांना झाली आहे. त्यानंतर शेखर, नेत्रा व अद्वैत विरोचकाच्या पुढील हाळचालींची माहिती व्हायला हवी असा विचार करतात. पुढे रुपाली सर्पलीपीने लिहिलेलं एक श्लोक मुद्दाम तिच्या खोलीत ठेवते व तो कागद मुद्दाम शेखरला दिसेल असा लपवून ठेवते.
त्यांतर शेखर तो कागद घेऊन नेत्रा, अद्वैत व इंद्राणी यांना दाखवते. त्यानंतर तो मंत्र अद्वैत वाचतो. पण घरातल्यांना गाफील करण्यासाठी व त्यांचा वेळ वाया घालवण्यासाठी रुपालीने हे सगळं केलेलं असतं. पुढे शेखर, इंद्राणी, नेत्रा व अद्वैत त्या मंत्राचा विचार करु लागतात. त्या मंत्राचा नक्की काय अर्थ असेल याचा ते विचार करु लागतात. मात्र यामागे रुपालीच असल्याचा संशय इंद्राणीला येतो. इतक्या सहजासहजी विरोचक हे करणार नाही, असा विचार ती करते.
पुढे रुपाली इंद्राणीविरुद्ध प्रतिबिंब शक्तीचा वापर करण्यासाठी मंत्राचे वाचन करते आणि मोठ्या पावसात व ढगांच्या गडगडाटात इंद्राणीचे प्रतिबिंब तयार होते असं वाटतं पण ते प्रतिबिंब नसतं. रुपाली इंद्राणीला अस्तिकट्यारबद्दल विचारणार इतक्यात तिथे नेत्रा येते. त्यानंतर इंद्राणी नेत्राला काहीतरी गडबड असल्याचे कळते. तसंच रुपाली माझ्याकडे अस्तिकट्यार मागत होती असं सांगते. त्यानंतर दोघी विरोचकांच्या नवीन शक्तीबद्दल विचार करत असतात.
आणखी वाचा – जय दुधाणेच्या वडिलांचे निधन, कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर, म्हणाला, “माझा सुपरहिरो गमावला”
पुढे रुपाली इंद्राणीचे प्रतिबिंब नसून मी खऱ्या इंद्राणीकडे अस्तिकट्यार मागत असल्याबद्दल स्वत:शीच संवाद साधते. त्यानंतर आता पुढे काय करायचं याचा विचार करत असताना रुपाली इंद्राणीविरुद्ध अस्तिकट्यारचा वापर न् करता आता शेखरविरुद्ध या शक्तीचा वापर करण्याचा विचार करते. पुढे इंद्राणी त्या मंत्राचे वाचन करत त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करते. तसेच आपल्याकडून एखादी चूक व्हावी हाच रुपाली विचार करत असणार असं ती म्हणते.
आणखी वाचा – मिथुन, वृषभ व कर्क राशीच्या लोकांसाठी बुधवार असणार फलदायी, नोकरीत व व्यवसायात होणार आर्थिक लाभ
त्यामुळे आता रुपालीने शेखरविरुद्ध प्रतिबिंब शक्तीचा वापर केल्यानंतर शेखर तिला अस्तिकट्यारची माहिती देणार का? की त्याआधीच राजाध्यक्ष कुटुंबीय सावध होणार हे आगामी भागांत पाहायला मिळेल.