उद्या, शनिवार, २२ जून रोजी चंद्राचे धनु राशीत भ्रमण होणार आहे. तसेच उद्या ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी असून या तिथीपासून ज्येष्ठ महिना संपतो आणि आषाढ महिना सुरू होतो. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी शुक्ल योग, ब्रह्म योग, लक्ष्मी नारायण योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने उद्याचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे उद्याचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार आहे? तुमच्या नशिबात नेमकं काय असणार? जाणून घ्या…
मेष : मेष राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात आनंद वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी शनिवारचा दिवस चांगला आहे. तुम्ही प्रत्येक काम संयमाने आणि समजुतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल आणि तुमच्या प्रयत्नांना यशही मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. नोकरदार महिलांसाठी शनिवारचा दिवस चांगला असणार आहे.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांच्या घरातील वातावरण प्रसन्न राहील. आर्थिक लाभाची संधी मिळेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच, इतर लोक तुमच्या कामाने खूप प्रभावित होतील. कुटुंबात गोडवा व विश्वासही वाढेल. एखाद्या खास व्यक्तीच्या भेटीमुळे तुमच्या कामाचा वेग वाढेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांना शनिवारी कौटुंबिक बाबींमुळे थोडी धावपळ करावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला कोणाशीही विनाकारण मस्करी करणे टाळावे लागेल. जवळच्या मित्राच्या मदतीने नवीन कामाचा विचार कराल. तुमचे आरोग्य चांगले राहील.
कर्क : कर्क राशीचे लोक ऑफिसच्या कामात थोडे व्यस्त राहतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कौटुंबिक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे टाळावे. तुमच्या भावाला किंवा बहिणीला मदत केल्याने तुम्हाला बरे वाटेल. करिअरमध्ये नवे आयाम प्रस्थापित कराल. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे.
सिंह : सिंह राशीच्या लोकांना काही विशेष कामाचा लाभ मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. पालकांशी तुमचे संबंध सुधारतील. तुमचा जोडीदार तुमच्या बोलण्याने प्रभावित होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. सामाजिक कार्यात यश मिळेल. वाहन खरेदी करण्याचा निर्णय घ्याल. प्रेमी युगुलांसाठी दिवस चांगला जाईल.
कन्या : कन्या राशीच्या लोकांचा कामाच्या ठिकाणी सर्वांशी चांगला ताळमेळ राहील. जुन्या मित्राला भेटून आनंद वाटेल. तुमच्या प्रियकरासाठी दिवस चांगला जाईल. तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल. कुटुंबात एकमेकांशी चांगले सामंजस्य राहील. अध्यात्माकडे तुमचा कल असेल. तुम्ही जे काही काम करण्याचा प्रयत्न कराल, त्यात तुम्हाला यश मिळेल.
तूळ : तूळ राशीच्या लोकांच्या आरोग्यात चढ-उतार येतील. तुमचे विचार व वागणूक संतुलित ठेवावी लागेल. कोणावरही जास्त विश्वास ठेवणे टाळा. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचार करणे चांगले राहील. तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर शनिवारचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.
वृश्चिक : वृश्चिक राशीचे लोक शनिवारी आपले ध्येय निश्चित करण्यासाठी नवीन योजना करू शकतात. घरगुती समस्या शांततेने सोडवण्यात यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळेल. घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. कुटुंबाबरोबर धार्मिक सहलीला जाण्याचा निर्णय घ्याल. प्रेमी युगुलांनी एकमेकांना भेटवस्तू दिल्यास नाते अधिक घट्ट होईल.
धनू : धनु राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असेल. शिक्षण घेत असलेल्या लोकांना त्यांच्या शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधीही उपलब्ध होतील. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना रोजच्या तुलनेत जास्त फायदा होईल. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची गरज आहे. आरोग्य चांगले राहील.
मकर : मकर राशीच्या लोकांचा सामाजिक क्षेत्रात कल वाढेल. सर्व कामात सकारात्मक परिणाम होतील. काही जुने मित्र भेटू शकतात. नोकरीत तुमचे सहकारी तुम्हाला मदत करतील. आरोग्य चांगले राहील. गृहिणींसाठी शनिवारचा दिवस चांगला असेल.शिक्षण घेणाऱ्या लोकांसाठी शनिवारचा दिवस चांगला असणार आहे.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी नियोजित केलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. शिक्षणाशी संबंधित लोकांच्या करिअरमध्ये नवीन बदल घडतील, जो त्यांच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर असेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. राजकारणाशी संबंधित लोकांची ओळख सामाजिक क्षेत्रात वाढेल.
मीन : मीन राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. शनिवारी तुम्हाला काही विशेष कामात अनुभवी व्यक्तीची मदत मिळू शकते. कुटुंबाबरोबर चित्रपट पाहण्याचा बेत असेल. तुम्हाला जुन्या गोष्टींकडे जास्त लक्ष देणे टाळावे लागेल. पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्या. तुमच्या वेळेचा सदुपयोग करून तुम्हाला फायदा होईल. आरोग्य चांगले असेल.