छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली सर्वांची आवडती अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर. या मालिकेत तिने अंजली पाठक ही भूमिका साकारत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांची जोडी मराठी मनोरंजन विश्वात प्रचंड लोकप्रिय झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर हे पडद्यावरचे सहकलाकार खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकले.
हार्दिक-अक्षया ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर हे दोघे त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. अक्षया सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्यापैकी सक्रिय असते. आपले अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या फोटो व व्हिडीओला प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच अभिनेत्रीने तिच्या आईच्या साठव्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये अक्षयाच्या अनेक नातेवाईकांनी सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. अभिनेत्रीच्या आईच्या बहिणी म्हणजेच अक्षयाच्या मावशींनी बहिणीच्या साठव्या वाढदिवसानिमित्त जंगी सेलिब्रेशन केले असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. साठव्या वाढदिवसानिमित्त एकूण साठ दिव्यांची आरास करून अक्षयाच्या आईचे खास औक्षण केले असल्याचेही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
तसेच अक्षयाच्या आईच्या गळ्यात नोटांची माळही असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अक्षया व तिच्या बहिणीने आईच्या बहिणींच्या मदतीने आपल्या आईचे औक्षण केले आहे. तसेच 60 लिहिलेल्या मोठ्या केकने अक्षयाने तिच्या आईचा वाढदिवस साजरा केला आहे. अक्षयाच्या आईच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक जोशीही उपस्थित होता. अक्षयाने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – Video : बायको वडाची पूजा करण्यासाठी पोहोचताच प्रथमेश परबने शूट केला खास व्हिडीओ, क्षितिजा म्हणाली, “नवरोबा…”
दरम्यान, अक्षयाने शेअर केलेल्या या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओखाली ‘खूपच छान, किती मस्त” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट्सद्वारे अक्षयाच्या आईला त्यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.