शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : बायको वडाची पूजा करण्यासाठी पोहोचताच प्रथमेश परबने शूट केला खास व्हिडीओ, क्षितिजा म्हणाली, “नवरोबा…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 21, 2024 | 2:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prathamesh Parab's wife Kshitija Ghosalkar has shared a special video of her first Vatpurnima.

Video : बायको वडाची पूजा करण्यासाठी पोहोचताच प्रथमेश परबने शूट केला खास व्हिडीओ, क्षितिजा म्हणाली, "नवरोबा..."

‘वटपौर्णिमा’ हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिलांनी वटवृक्षाची पूजा केल्यास नवऱ्याचे आयुष्य वाढते, असे मानले जाते. त्यामुळे सर्वसामान्य महिलांपासून ते कलाविश्वातील अभिनेत्रींपर्यंत जवळपास सगळ्याच जणी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. यंदा मराठी सिनेसृष्टी व टेलिव्हिजनवरील अनेक जण विवाहबंधनात अडकले. त्यामुळे यावर्षी बऱ्या सेलिब्रेटींचा पहिला वटपौर्णिमेचा सण आहे. अनेक मराठी कलाकार आज पहिल्यांदाच त्यांची वटपौर्णिमा साजरी करणार आहेत.

ग्धा-प्रथमेश, गौतमी-स्वानंद, शिवानी-अजिंक्य, तितीक्षा-सिद्धार्थ आदी कलाकारांसह ‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परब हादेखील विवाहबंधनात अडकला. त्यामुळे प्रथमेश व त्याची पत्नी क्षितिजा यांच्यासाठीही यंदाचा वटपौर्णिमेचा सण विशेष असणार आहे. आजच्या या वटपौर्णिमेच्या खास सणानिमित्त प्रथमेशची बायको क्षितिजाने तिच्या माहेरी गेली असून बायकोसह अभिनेता प्रथमेश परबही त्याच्या सासरवाडीत गेला आहे. नुकताच क्षितिजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पहिल्या वाटपौर्णिमेचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kshitija Ghosalkar Parab (@miles_in_style)

आणखी वाचा – दादा कोंडकेंनी दिलेल्या ‘त्या’ भाजीमुळे रझा मुराद महाराष्ट्राच्या प्रेमात, अभिनेत्याने सांगितली ‘ती’ खास आठवण

क्षितिजाने हा खास व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “प्रथमेश, फक्त सात जन्मासाठी नाही तर प्रत्येक जन्मासाठी तूच पाहिजे आहेस. वडाच्या झाडासारखे आपले नाते दीर्घायुषी असावे. जन्मोजन्मी फक्त तुझीच सोबत असावी”. तसेच तिने प्रथमेशला “वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा” असंही म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये क्षितिजाच्या गावची खास झलकही पाहायला मिळत आहे. आजच्या या खास क्षणासाठी तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. तसेच पूजेच्या ताटाचा खास फोटोही तिने शेअर केला आहे.

आणखी वाचा – पहिल्या वटपौर्णिमेसाठी श्रीवर्धनला बायकोच्या माहेरी पोहोचला प्रथमेश परब, दोघांच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओ व फोटो व्हायरल

दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी प्रथमेश व क्षितिजा यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. अगदी थाटामाटात व पारंपरिक अंदाजात दोघांनी लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. दोघे त्यांच्यातील क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच प्रथमेश-क्षितिजा या दोघांनी त्यांच्या पहिल्या वटपौर्णिमेचे काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत

Tags: marathi entertainment newsprathamesh parabprathamesh parab and kshitija ghosalkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
sonakshi sinha wedding

लग्नाच्या दोन दिवसांआधीच सोनाक्षी सिन्हाच्या सासर व माहेरकडची मंडळी एकत्र, वडीलही अगदी खुश, Inside Photo समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.