गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर हे सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे. लग्नाच्या ८ महिन्यांनंतरच दलजीत कौर पतीपासून विभक्त झाली आहे. २०२३ मध्ये दलजीत कौरने केनियातील उद्योगपती निखिल पटेलबरोबर लग्न केले. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांच्या नात्यात अडचणी येऊ लागल्या. अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल रोज काहीना काही बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अशातच आता दलजीत कौरने निखिल पटेलच्या नावाचा वापर केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे दावा केला आहे की निखिलने भारतात त्याच्यासाठी एक पीआर ठेवला आहे. हा सर्वात मोठा विनोद असल्याचेही तिने सांगितले. त्यामुळे निखिलने सार्वजनिकरित्या तिच्या नावाचा वापर करु नये. तसेच त्याने स्वत:च्या फायद्यासाठी तिच्या नावाने प्रसिद्धी घेणे आणि लोकप्रियतेसाठी इतके हताश होणेदेखील थांबवले पाहिजे.
दलजीतने त्याच्याविरुद्ध केनियाच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. दलजीत कौर केनियाहून परतली असून निखिल तिचे सामान बाहेर काढू शकत नाही. तिने केनियाच्या कोर्टाकडून त्यावर स्थगिती घेतली आहे. दलजीत कौरने काही दिवसांपूर्वी पती निखिल पटेलवर फसवणूक व विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. मात्र निखिल पटेलने दलजीत कौरचे हे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, दलजीत कौर व निखिल पटेल यांच्या लग्नाला एक वर्षही पूर्ण झालेले नाही. तिच्या दुस-या लग्नानंतर दलजीत केनियाला गेली. पण ती आता भारतात परतल्यानंतर तिच्याबाबत विविध प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. याआधी दलजीतचा अभिनेता शालीन भानौतबरोबर घटस्फोट झाला आहे.