गेले अनेक वर्ष ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. दया, जेठालाल, बाबुजी, तारक मेहता, टप्पू अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. या मालिकेचा टीआरपीदेखील कमी जास्त होत असतो. या मालिकेतील बाबूजी म्हणजेच चंपकलाल ही भूमिका प्रेक्षकांच्या अधिक जवळची वाटते. ही भूमिका अमित भट्टने साकारली आहे. त्याच्याबद्दलची एक अपडेट समोर आली आहे. (champaklal lifestyle )
‘तारक मेहता…’ या मालिकेमध्ये जेठालाल हे मुख्य पात्र आहे. जेठाचे वडील म्हणजे चंपकलाल हेदेखील अधिक लोकप्रिय आहेत. मालिकेमध्ये जरी ते चांगली शिकवण देत असले तरीही खऱ्या आयुष्यात त्यांची लाईफस्टाइल खूपच वेगळी आहे. अमित यांचे ५० वर्ष असून चंपकलाल म्हणून त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. ते एका एपिसोडसाठी ८० हजार रुपये घेतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमित भट्ट हे सुरुवातीला खूप बिडी प्यायचे आणि ते बिडी चेनस्मोकरदेखील होते. अमित हे दिलीप जोशी यांचे खास मित्र आहेत. अनेकदा एकमेकांबरोबर धमाल मस्ती करतानाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या मालिकेमधील अमित व दिलीप यांची बाप मुलाची जोडी पसंत केली जाते. जेठावर त्यांचा राग करण्याची पद्धत पाहूनही प्रेक्षकांना खूप आनंद होतो.
कृती भट्ट असे अमित भट्टच्या पत्नीचे नाव आहे. ते अनेकदा पत्नीबरोबरचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असतात. तसेच त्यांना दोन मुलं असून दीप व देव अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्या एका मुलाने ‘तारक मेहता…’मध्ये टप्पूच्या मित्राची भूमिका साकारली होती. तारक मेहता या मालिकेमध्ये नवीन दया येणार अशी चर्चा सुरु होती. तसेच ही मालिका यापुढेही प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन करणार आहे.