‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेच्या रंजक अशा कथानकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मालिकेचं कथानक हे गावाकडून आलेल्या पारू या मुलीभोवती फिरत असल्याचं दिसत आहे. याचबरोबर शहरीबाना आणि धाडसी वृत्ती असलेल्या अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचा करारीपणा ही प्रेक्षकांना अधिक भावतोय. मालिकेत पारू ही भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणे साकारत आहे. (sharayu sonawane husband birthday)
शरयूने आजवर अनेक मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ‘पारू’ या मालिकेआधी शरयू ‘पिंकीचा विजय असो’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचली. तर ‘पारू’ मालिकेतील पारू या व्यक्तिरेखेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. सोशल मीडियावरही पारू बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ‘पारू’ मालिकेतील सहकलाकारांबरोबर ती नेहमीच ट्रेंडिंग रील व्हिडीओ बनवून शेअर देखील करते. काही दिवसांपूर्वी पारू म्हणजेच शरयू तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली होती.
शरयूने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी शेअर केलेल्या पोस्टने ही चर्चा रंगली. लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच पारुने तिचं लग्न जाहीर केले. काही वर्षांपूर्वी पारूने निर्माता जयंत लादेसह साखरपुडा समारंभ उरकत त्याचे काही फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले होते. मात्र त्यानंतर त्यांनी केव्हा लग्न केलं हे कळलच नाही. थेट लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी लग्नसमारंभातील काही खास क्षण शेअर करत तिने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. अचानक लग्नाचे फोटो समोर आल्याने चाहत्यांनाही आनंदाचा धक्का बसला.

शरयूने निर्माते जयंत लादेसह लग्नगाठ बांधली. शरयूच्या पतीचा आज वाढदिवस असून तिने सोशल मीडियावरुन खास फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये तिने ‘हॅपी बर्थडे हार्ट’, असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. तर जयंतनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या एका पोस्टने लक्ष वेधलं आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने सासूबाईंचे आभार मानले आहेत. या फोटोत शरयूची आई जयंतचे औक्षण करताना दिसत आहे.