रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ते अजूनही ऑफिसला सायकलने जातात”, ‘फादर्स डे’निमित्त प्रथमेश परबची वडिलांसाठी भावुक पोस्ट, म्हणाला, “जीवनशैली बदलली तरी…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 16, 2024 | 10:41 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prathamesh Parab shared an emotional post for his father on the occasion of Father's Day.

“ते अजूनही ऑफिसला सायकलने जातात”, ‘फादर्स डे’निमित्त प्रथमेश परबची वडिलांसाठी भावुक पोस्ट, म्हणाला, “जीवनशैली बदलली तरी...”

खरंतर ‘बाप’ नावाच्या माणसासाठी कोणताही एक दिवस नसतो. तर त्याच्यामुळेच आपल्या आयुष्यातील सर्वच दिवस असतात. मात्र आपल्या आयुष्यातील ‘बाप’ नावाच्या माणसाबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून भारतात दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ‘फादर्स डे’ साजरा केला जातो. ‘बाप’ हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील पडद्यामागील कलाकार असतो. त्यामुळे आजच्या दिवशी सर्वचजण आपल्या वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पाहायला मिळतात. अशीच कृतज्ञता व्यक्त केली आहे अभिनेता प्रथमेश परबने.

‘टाईमपास’ या लोकप्रिय चित्रपटातून दगडू म्हणून लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. प्रथमेशने आजवर अनेकविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या भूमिकांमुळे चर्चेत राहणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. आशातच आज त्याने ‘फादर्स डे’च्या निमित्ताने वडिलांबद्दल एक खास पोस्ट शेअर केली असून या पोस्टद्वारे त्याने फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

या पोस्टमध्ये प्रथमेशने त्याच्या वडिलांबद्दल भावना व्यक्त करताना असं म्हटलं आहे की, “गेल्या काही वर्षांत खूप काही बदललं. वेगवेगळे चित्रपट, त्यातील पात्रे, कथा, तुम्हाला माणूस म्हणूनही घडवत असतात. चाळीमधून फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. स्विफ्टची जागा क्रेटाने घेतली. जीवनशैली बदलत असली तरी काही गोष्टींची पाळंमुळं आपल्यात कायम रुजू द्यावी हे मात्र मी माझ्या बाबांकडून शिकत आहे”.

आणखी वाचा –

यापुढे त्याने “गेली ३० ते ३५ वर्षे ते सायकल चालवतात. अजूनही ऑफिसला ते सायकलने जातात. काम करत रहावं, माणूस आपोआप तंदुरुस्त रहातो असं त्यांचं म्हणणं. बाबा, तुम्ही आयुष्यभर असेच तंदुरुस्त आणि आनंदी रहा याच ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा” असं म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेशचे बाबा सायकलवर असून प्रथमेश त्यांच्याशी खास संवाद साधतानाचे पहायला मिळत आहे.

आणखी वाचा –

त्याचबरोबर लेकाच्या कामगिरीमुळे त्याच्या वडिलांनादेखील त्याच्यावर गर्व वाटत असून ते या व्हिडीओमध्ये भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, प्रथमेशने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेक चाहत्यांनी अभिनेता व त्याच्या वडिलांना ‘फादर्स डे’निमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.    

Tags: marathi actormarathi entertainment newsprathamesh parab
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kushal Badrike shared a video of his wife doing riyaz of dance and he also written a funny caption

Video : कुशल बद्रिकेने शेअर केला बायकोचा रियाज करतानाचा व्हिडीओ, म्हणाला, “मी मध्ये काही बोललो तर...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.