‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आदित्यची तब्येत अचानक खूपच खालावलेली असते मात्र डॉक्टरही भर पावसामुळे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यानंतर काही वेळाने डॉक्टर स्वतःच फोन करतात आणि श्रीकांतजवळ दुसरा कोणी डॉक्टर उपलब्ध झाला आहे का? याबाबत विचारपूस करतात. तर यावर श्रीकांत नाही असं सांगतो. यावर डॉक्टर सांगतात की, ती तुमच्या घरी काम करते ती पारू तिला आयुर्वेदाची थोडीफार माहिती आहे. त्यामुळे तुम्ही तिला बोलावून घ्या ती काहीतरी त्यावर उपचार करेल, असं सांगितल्यावर श्रीकांत लगेच सावित्रीला पारूला बोलवायला पाठवतो. (Paaru Marathi Serial)
तर पारूला सावित्री येऊन सांगते की, आदित्यची तब्येत अचानक खालावली आहे त्यामुळे तुला श्रीकांत सरांनी तात्काळ बोलावलं आहे मात्र पारू यायला नकार देते, कारण दामिनीने पारुला शपथ दिलेली असते की, तू अहिल्यादेवींच्या परवानगीशिवाय जर बंगल्यात आलीस तर अहिल्यादेवीचं मेलेलं तोंड तुला दिसेल. त्यामुळे अहिल्यादेवीची ही शपथ पाळण्यासाठी पारू बंगल्यात येण्यास नकार देते. तितक्यात अहिल्यादेवी स्वतः पारूजवळ येतात आणि पारुला सांगतात की, मी अहिल्यादेवी म्हणून नाही तर एक आई म्हणून तुला विनंती करत आहे की, तू आदित्यला बरं कर. अहिल्यादेवींनी विनंती केल्यावर पारू अहिल्यादेवींच्या पाया पडते आणि सांगते की, तुम्ही यापुढे माझ्यासमोर कधीच विनंती करु नका. तुम्ही फक्त आदेश सोडा. यावर अहिल्यादेवी म्हणतात, मी अहिल्यादेवी किर्लोस्कर तुला बंगल्यात जाण्याचे आदेश देत आहे. त्यानंतर पारू लगेच बनवलेला लेप व काढा घेऊन बंगल्यात जाते आणि आदित्यला काढा पाजते.
त्यानंतर अहिल्यादेवींना ती थंड पाण्याच्या घड्या आदित्यच्या डोक्यावर घालायला सांगते आणि स्वतः पायाला लेप लावत बसते. सगळेजण तिकडून निघून जातात त्यानंतर सकाळी आदित्यला जाग येते तेव्हा अहिल्यादेवी आणि पारू तिथेच झोपलेल्या दिसतात. तर इकडे दिशा दामिनीचा पारुला बंगल्यात परत न घेण्याचा डाव फसलेला असतो. अखेर पारूने आदित्यला बरं केलेलं असतं आणि पारूमुळेआदित्यचा ताप पूर्णपणे गेलेला असतो. त्यानंतर पारू मी घरी जाऊन आवरून आदित्य सरांच्या नाश्त्याचे बघते असं सांगते आणि घरी जायला निघते. घरी आल्यावर पारू देवासमोर हात जोडून देवाचे आभार मानते. त्यानंतर अहिल्यादेवींनी आणि श्रीकांतने गुरुजींना बोलवलेलं असतं. गुरुजी जेव्हा आदित्यची पत्रिका पाहतात तेव्हा म्हणतात की, मी तुम्हाला या आधीच सांगितलेलं होतं की, आदित्यवर खूप मोठं संकट कोसळणार आहे.
आणखी वाचा – सायली प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आणणार का?, साक्षीलाही अर्जुन-चैतन्यवर संशय, मोठा ट्विस्ट
मात्र आदित्यच्या भाग्यात सगळं काही चांगलं असल्याचं ते सांगतात. आणि आदित्यच्या बायकोचं सुरक्षा कवचच आदित्यची साथ देईल आणि आदित्यची काळजी घेईल असं सांगतात. हे ऐकल्यावर अहिल्यादेवी आणि श्रीकांतला धक्काच बसतो. आता आदित्य व पारूच्या लग्नाचं सत्य समोर येणार का?, गुरुजी आदित्यच्या लग्नाबाबत सत्य सांगणार का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.