मनोरंजन विश्वात एकामागोमग एक धक्कादायक माहिती समोर येताना पाहायला मिळत आहे. अशातच एका लोकप्रिय अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक केलं असल्याचं समोर आलं आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याला एका हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. या अभिनेत्याला म्हैसूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुनाच्या प्रकरणात दर्शनचे नाव समोर आले असून, त्याच आधारे पोलिसांनी कारवाई केली आहे. (Kannada Actor Arrest In Murder Case)
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, बेंगळुरु शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा आणि त्याच्या नऊ सहकाऱ्यांना एका खून प्रकरणात ताब्यात घेतले. माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, चित्रदुर्गातील रेणुकास्वामी नावाच्या व्यक्तीच्या खून प्रकरणात ही कारवाई केली आहे. रेनुकास्वामी नावाची व्यक्ती चित्रगुर्ग नावाच्या एका मेडिकल शॉपमध्ये अस्टिस्टंट होती. नुकतंच तिचं लग्न झालं होतं.
माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मृताचे आधी चित्रदुर्ग येथून अपहरण करण्यात आले आणि नंतर कामाक्षीपल्यच्या पश्चिम भागात हत्या करण्यात आली. यानंतर नाल्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पुढे असेही सांगितले की, कन्नड अभिनेता दर्शन आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली असून या सर्वांची चौकशी सुरु आहे. आम्ही जास्त माहिती देऊ शकत नाही. अभिनेता दर्शनच्या करिअरची सुरुवात महाभारतापासून झाली होती. अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक सहाय्यक भूमिका केल्या आणि नंतर मुख्य नायक म्हणून काम केले.