झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अप्पी व अर्जुन हे सात वर्षांनी आता पुन्हा एकदा एकत्र येत असल्याचं चित्र दिसत आहे. काही कारणांनी हे दोघे वेगळे झाले होते, मात्र आता हे दोघे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. सिंबामुळे अप्पी-अर्जुन एकत्र येतानाचे पाहायला मिळत आहे.
अप्पी अमोलपासून अर्जुनच त्याचा बाबा असल्याचे लपून ठेवते. मात्र अर्जुनच आपला बाबा असल्याचे सत्य आता अमोलला समजलं आहे. शिवाय बाबांच्या घरच्यांची आणि त्याच्या माँची भांडणं झाली असल्याचेही अमोलला कळले आहे. त्यामुळे आता या दोन्ही घरांना एकत्र आणण्यासाठी अमोल स्वतः कष्ट घेताना दिसत आहे. मालिकेत नुकताच अर्जुन व आर्याचा साखरपुडा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता अप्पीने अर्जुनविषयीच्या सर्व आशा सोडून दिल्या आहेत.
अशातच आता या मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. हा नवीन प्रोमो सध्या सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये अप्पीके बाबा अमोलला अर्जुनच्या वडिलांशी भेट घडवून आणण्यासाठी भेटतात. यावेळी अर्जुनचे वडील अमोलला त्यांच्या घरी येण्याविषयी बोलतात. तेव्हा अमोल त्यांना उत्तर देत असं म्हणतो की, “मी अप्पी व बाबांबरोबर घराच्या बाहेर पडलो होतो. तर मी त्यांना घेऊनच घरी येणार आहे.”
तसेच यापुढे अप्पी आपल्याला गुन्हेगाराला पकडायचं आहे पण ते स्वत:च्या जीवाची काळली घेऊन. तसेच पुढे ती अर्जुनला असं म्हणते की, “तुझ्यावरची जबाबदारी आता वाढली आहे”. यावर अर्जुन तिला “एक पोलिस अधिकारी म्हणून ना?” असं प्रश्न विचारतो., यावर अप्पीही उत्तर देत “एक बाप म्हणूनसुद्धा” असं म्हणते.
त्यामुळे आता एकीकडे अमोल त्याच्या आई-बाबांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे अप्पीही अर्जुनला त्याच्या बाबा असण्याची सारखी जाणीव करून देत आहे. त्यामुळे आता अप्पी-अर्जुन हे दोघे एकत्र येणार का? अमोल या दोघांना एकत्र आणू शकेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.