‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, दामिनी पारूजवळ येते आणि आदित्यला खूप बरं नसल्याचं सांगते. शिवाय आदित्यला तुझ्या लेपाने बरं वाटलं असंही सांगते. मात्र आता लेप नसल्याने आदित्यला खूप त्रास होत आहे असं ती सांगते. शिवाय आणखी चढवून सांगत म्हणते की, वहिनींनी तुझ्यासाठी खूप चुकीचे शब्द वापरले. नोकर माणसांची जागा ही दरवाजा जवळच्या चप्पल प्रमाणे आहे, असं त्या म्हणाल्या. यावर पारू काहीच बोलत नाही आणि ती लेप बनवून देते. तो लेप घेऊन दामिनी अहिल्यादेवीकडे जाते. आणि सांगते पारूने लेप दिला आहे. (Paaru Serial Update)
या लेपासाठी पदर पसरवून मी भीक मागितली कारण मला आपल्या आदित्यची काळजी वाटत आहे. मला आपल्या आदित्यला असं पाहावत नव्हतं म्हणून मी तिच्याकडून हा लेप घेऊन आले हा लेप देताना तिने मला एक अट दिली आहे. या घरात एक तर दिशा तरी राहील नाहीतर ती. यावर अहिल्या देवीचा पारा चढतो आणि त्या हा लेप फेकून देण्यास सांगतात आणि मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टराला मी इथे उभं करेन, मला तिची काहीच गरज नाही, असेही सांगतात. आणि तिथून निघून जातात. त्यानंतर त्यानंतर दामिनी तो लेप घेऊन पारूजवळ येते आणि सांगते की हा लेप मला कचऱ्याच्या डब्यात टाकायला सांगितला आहे आणि तो लेप तिच्या समोरच कचऱ्याच्या डब्यात टाकते.
हे पाहून पारूला खूप दुःख होतं. तर इकडे दामिनी आणि दिशा नवीन प्लॅन बनवतात. आदित्यला आजारी पाडून दिशाला मदत करुन सगळ्यांच्या नजरेत यायचं असतं आणि किर्लोस्करांना उपकाराखाली ठेवायचं असतं म्हणून आदित्यला थंडगार असं ज्यूस प्यायला देतात. ते पिऊन आदित्यला खूप ताप येतो. त्यानंतर अहिल्यादेवी आदित्यच्या काळजीत असतात की आदित्यला इतका ताप कसा आला आहे?, या आधी असं कधीच झालं नाही आणि श्रीकांत डॉक्टरांना फोन लावतो, मात्र डॉक्टरही भर पावसामुळे कुठेतरी अडकलेले असतात आणि ते येऊ शकत नाही. त्यावेळेला आदित्यच्या आजारपणाचं खूपच टेन्शन सगळ्यांना आलेलं असतं.
तर इकडे कोसळणारा पाऊस आणि सुटलेला वारा पाहून पारु, मारुती चिंतेत असतात. देवासमोर दिवा लावताना पारू काळजी व्यक्त करते. नेमकं काय होतं आहे हे मला कळत नाही आहे, त्यानंतर पारू देवाजवळ प्रार्थना करत असताना दिवा विझतो. आता हा दिवा विझण्याचा संकेत नेमका काय असणार हे मालिकेच्या आगामी भागात कळेल.