अल्पावधीतच ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. या मालिकेतील कथानकाने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेचं कथानक हे गावाकडून आलेल्या पारू या पात्राभोवती फिरणार पाहायला मिळत आहे. तर अहिल्यादेवींचा करारीपणा प्रेक्षकांना विशेष भावतो. मालिकेत पारू व आदित्य यांच्यातील मैत्रीही पाहणं रंजक ठरतंय. तर दिशा व दामिनी यांची कटकारस्थान या मालिकेची उत्सुकता आणखी वाढवतात असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. (Damini In Real Life)
दिशा व दामिनी यांनी मिळून पारूला धडा शिकवण्याचा निर्णय सध्या मालिकेत पाहायला मिळत आहे. आदित्यच्या जवळ जाण्याचा पारूचा प्रयत्न असतो असा गैरसमज दामिनी व दिशा अहिल्यादेवींच्या मनात तयार करतात. दिशा व दामिनी यांच्यावर विश्वास ठेवून अहिल्यादेवी पारूला शिक्षाही सुनावतात आणि कामावरुन काढून टाकतात. दिशा दामिनीला तिच्या बोटांवर नाचवत असते. आणि दामिनी स्वतःची बुद्धी न वापरता दिशा सांगेल तसे वागत असते.
याआधीही दिशामूळे बरेचदा दामिनीला शिक्षेला सामोरे जावे लागले आहे. मात्र दामिनीला हे कळत नाही. तर पारूचा सूद घ्यायचा हा एकच उद्देश दामिनीचा असतो. दामिनी ही किर्लोस्कर कुटुंबाची धाकटी सून आहे. गावाकडून आलेल्या दामिनीचा हा प्रवास मालिकेत पाहायला मिळत आहे. गावाकडून आल्यानंतर अचानक पैसा, श्रीमंती मिळाल्याने दामिनीच्या वागणुकीत बदल झालेला असतो. शिवाय दामिनी स्वतःची बुद्धी न वापरता कायमच दुसऱ्याच्या बोलण्यावरुन तर्क लावते आणि घरात लावालाव्या करण्याचं काम करत असते.
दामिनी हे पात्र अभिनेत्री श्रुतकिर्ती सावंत साकारत आहे. पारू या मालिकेतील दामिनी या भूमिकेमुळे श्रुतकिर्तीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याआधी श्रुतकिर्तीने ‘तुझ्या रूपाचं चांदनं’, ‘कारभारी लयभारी’, ‘जीवाची होतीया काहिली’ या मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत छोटा पडदा गाजवला. श्रुतकिर्ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. खऱ्या आयुष्यात दामिनी म्हणजे श्रुतकिर्ती फारच ग्लॅमरस आहे. तसेच सोशल मीडियावर असं पाहायला मिळालं की अभिनेत्री तितकीच साधीही आहे. श्रुतकिर्तीला साधेपणा व फॅशनची उत्तम जाण असून नेहमीच ती या गोष्टी सहज हाताळताना दिसते.