रविवार, मे 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या हल्ल्याचा उत्साह साजरा केला आणि…”, हल्ल्यानंतर बॉलिवूडकरांनी पाठिंबा न दिल्याने कंगना रणौत भडकली, म्हणाली, “लक्षात ठेवा की…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 7, 2024 | 3:43 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
kangana ranaut on bollywood

"माझ्या हल्ल्याचा उत्साह साजरा केला आणि…", हल्ल्यानंतर बॉलिवूडकरांनी पाठिंबा न दिल्याने कंगना रणौत भडकली, म्हणाली, "लक्षात ठेवा की…"

अभिनेत्री कंगना रणौत सध्या अभिनयामुळे नाही तर राजकारणामुळे खूप चर्चेत आली आहे. मंगळवारी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर कंगना हिमाचल प्रदेशमधील मंडी विभागातून निवडून आली. त्यानंतर गुरुवारी लगेचच तिच्याबरोबर अशी घटना घडली ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. निवडणुका जिंकल्यानंतर पाहिल्यांदाच दिल्ली येथे जात होती. यावेळी चंदीगढ एअरपोर्टवर महिला कॉन्स्टेबलने कंगनाच्या कानशिलात लगावली होती. या प्रकरणावर आता सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे. तिच्या चाहत्यांनी संबंधित माहिलेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली होती. (kangana ranaut on bollywood)

कंगनाबरोबर सदर प्रकार घडल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. कंगनानेदेखील आपबिती सांगितली. मात्र इतके होऊनही बॉलिवूडमध्ये शांतता असेलेली दिसून आली. यामुळे कंगनाला खूप वाईट वाटले. तिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून बॉलिवूडकरांवर निशाणा साधला आहे. पण काही वेळानंतर तिने शेअर केलेली पोस्ट डिलिटही केली.

आणखी वाचा – Video : बाबा झाल्यानंतर लेकीला पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर घेऊन आला वरुण धवन, रुग्णालयामधून घरी जातानाचा व्हिडीओ व्हायरल

या पोस्टमध्ये कंगनाने लिहिले की, “प्रिय, चित्रपटसृष्टी माझ्यावर जो हल्ला झाला त्यावर सर्वांनी उत्साह साजरा केला. तसेच शांततादेखील बाळगली. पण हे लक्षात ठेवा की उद्या तुम्ही देशातील रस्त्यावर फिरत असाल तेव्हा जर इस्रायली किंवा फिलिस्तानी लोकांनी तुमच्या मुलांवर हल्ले केले तर काय होईल? तुम्ही केवळ राफासाठी उभे राहिलात, इस्रायल प्रकरणाचं तुम्ही समर्थन केलं. यामुळे जर तुमच्या मुलांच्या जीवाला धोका निर्माण झालं तर बघा मी तुमच्या स्वातंत्र्यासाठी लढेन. जेव्हा तुम्हाला वाटेल की मी का आहे? कुठे आहे? तर लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे मी नाही”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील राहत्या घरी मोठी चोरी, सांगितली घटना, म्हणाली, “१० तोळे सोनं, पैसे गेले आणि…”

तसेच दुसऱ्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘ऑल आईज ऑन राफा’ गॅंग ही तुमच्याबरोबर किंवा तुमच्या मुलांबरोबरही होऊ शकतं. जेव्हा तुम्ही एखाद्यावरील हल्ल्याचे समर्थन करता तेव्हा लक्षात ठेवा की हे एक दिवस तुमच्याबरोबरही होऊ शकतं”.

कंगना निवडून आल्यापासून काही ना काही विवादांमध्ये अडकत चालली आहे. संसद भवनात बैठकीसाठी उपस्थित राहत असतानादेखील तिने पत्राकरांबरोबर हुज्जत घातली. हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Tags: bollywoodinstagram storykangana ranaut
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kitchen Hacks
Lifestyle

Kitchen Tips : जेवण बनवताना खूपच तारांबळ होते?, मधुराच्या ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

मे 11, 2025 | 5:00 pm
Marathi actor chetan dalvi journey
Entertainment

ब्रेनस्ट्रोक, इंडस्ट्रीला विसर अन्…; मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्याचा सगळ्यात वाईट काळ, आता दिसतात असे

मे 11, 2025 | 1:00 pm
Mumbai Shocking News
Women

अश्लील व्हिडीओ दाखवून आठ वर्षाच्या मुलीचे कपडे काढणारा ‘तो’ जिवंत राक्षस

मे 11, 2025 | 10:00 am
Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Next Post
Paru marathi Serial update

आदित्यला दुखापत झाल्यानंतर पारूने रडत सांगितली तिच्या मनातली गोष्ट, अहिल्यादेवींना दामिनी दोघांविषयी भडकवणार, पुढचा निर्णय काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.